IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुमार कामगिरी सुरू आहे. सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. असं असताना महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरणार की नाही याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर
IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 10, 2026 | 5:11 PM

IPL 2026, MS Dhoni: आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात काही चांगली झालेली नाही. सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता स्पर्धेतील पुढची वाट आणखी किचकट होत जाणार आहे. या तिन्ही सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला महेंद्रसिंह धोनीचं मार्गदर्शन लाभलं नाही. त्याच्या गैरहजेरीत संघाची स्थिती नाजूक झाल्याचं चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. महेंद्रसिंह धोनी पोटरीच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे अजूनही मैदानापासून दूर आहे. फ्रेंचायझीने स्पष्ट केलं होतं की, धोनी सुरूवातीचे दोन आठवडे खेळणार नाही. पण त्याच्याबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. रिपोर्टनुसार, धोनी 11 एप्रिल 2026 रोजी एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सामना खेळणार नाही. हा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. त्यामुळे त्याच्या गैरहजेरीत पुन्हा एकदा सीएसके चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

महेंद्रसिंह धोनी मैदानात कधी परतेल याची प्रतीक्षा चाहते करत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 14 एप्रिलला सामना होणार आहे. या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. महेंद्रसिंह धोनी पूर्णपणे फिट असेल तर 14 एप्रिलला केकेआरविरुद्धच्या सामन्यात खेळेल. या सामन्यात खेळला तरी इम्पॅक्ट प्लेयर असू शकतो. पण त्याबाबत काही सांगणं कठीण आहे. कारण चेन्नई सुपर किंग्सने त्याच्या पुनरागमनाबाबत काहीच स्पष्ट केलेलं नाही. महेंद्रसिंह धोनी दुखापत सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत असून चेन्नईमध्येच थांबला आहे. संघाच्या सपोर्ट स्टाफच्या देखरेखीखाली पुनर्वसन उपचार घेत आहे. त्यामुळे आता किती प्रतीक्षा करावी लागेल हे सांगणं कठीण आहे.

महेंद्रसिंह धोनीने काही दिवसांपूर्वी नेटमध्ये सराव केला होता. पण दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्यास पूर्णपणे फिट नाही. त्यात दक्षिण अफ्रिकेचा युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस दुखापतग्रस्त झाल्याने सीएसकेला आणखी एक धक्का बसला होता. बरगडीच्या स्नायूला दुखापत झाल्याने ब्रेव्हिस पहिल्या तीन सामन्यातून बाहेर गेला. पण आता त्याच्या दुखापतीत सुधारणा झाली आहे. ब्रेव्हिसने एक पोस्ट करत, 11 एप्रिलला मैदानावर परतणार असल्याचं सांगितलं आहे.

Follow Us