AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBL: नशीब! कॅच पकडण्याच्या नादात डोळा गेला असता, पहा VIDEO

BBL: सुदैवाने त्याचा डोळा वाचला. कुठल्या मैदानात, कुठल्या सामन्यात हे घडलं? 11 व्या ओव्हरमध्ये ही दुर्घटना घडली. लेग स्पिनर स्वेपसनच्या चेंडूवर गिलक्स आक्रमक फटका खेळला.

BBL: नशीब! कॅच पकडण्याच्या नादात डोळा गेला असता, पहा VIDEO
BBL Image Credit source: GETTY IMAGES/sceeegrab
| Updated on: Dec 27, 2022 | 5:51 PM
Share

सिडनी: क्रिकेटच्या मैदानात काहीवेळा खेळाडूंबरोबर दुर्घटना घडतात. चेंडू लागून किंवा पळताना अडखळून खेळाडू जखमी होतात. काहीवेळा स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षकही सामन्यादरम्यान जखमी होतात. बिग बॅश लीग 2022-23 च्या 17 व्या सामन्यात असच दृश्य पहायला मिळालं. सिडनीच्या शोग्राऊंड स्टेडियममध्ये हा सामना झाला. सिडनी थंडरचा ओपनर मॅथ्यू गिलक्सच्या एका शॉटमुळे स्टेडियममध्ये बसलेला एक प्रेक्षक थोडक्यात वाचला. गिलक्सने लांबलचक सिक्स मारला. चेंडू थेट चाहत्याच्या चेहऱ्यावर लागला.

कितीव्या ओव्हरमध्ये घडली दुर्घटना?

सिडनी थंडरच्या डावात 11 व्या ओव्हरमध्ये ही दुर्घटना घडली. लेग स्पिनर स्वेपसनच्या चेंडूवर गिलक्स आक्रमक फटका खेळला. या ओव्हरमध्ये गिलक्सने तीन सिक्स मारले. दुसरा सिक्स चाहत्याच्या चेहऱ्यावर लागला. सुदैवाने थोडक्यात त्याचा डोळा वाचला.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

स्वेपसनच्या चौथ्या चेंडूवर गिलक्सने लॉन्ग ऑनच्यावरुन शॉट मारला. चेंडू प्रेक्षक स्टँडमध्ये गेला. एका चाहत्याने तो चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पण अंदाज चुकला व चेंडू चेहऱ्यावर लागला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गिलक्सने या शॉटबरोबर आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अवघ्या 31 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. हेल्स, गिलक्सने मिळवून दिला विजय

सिडनी थंडरने हा सामना 10 विकेटनी जिंकला. ब्रिस्बेन हीटने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 121 धावा केल्या. प्रत्युत्तरात सिडनीने अवघ्या 11.4 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं. सिडनी थंडर एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठलं. गिलक्सने नाबाद 56 आणि एलेक्स हेल्सने नाबाद 59 धावा केल्या. त्यांनी आपल्या टीमला 10 विकेटने मोठा विजय मिळवून दिला.

हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.