AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : इंग्लंड दौऱ्यासाठी आणखी एक संघ जाहीर, सर्फराजचा भाऊ मुशीर खान याला संधी, आणखी कुणाचा समावेश?

England Tour 2025 : निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी निवड समितीने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात 16 पैकी काही असे खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जाणून घ्या.

Cricket : इंग्लंड दौऱ्यासाठी आणखी एक संघ जाहीर, सर्फराजचा भाऊ मुशीर खान याला संधी, आणखी कुणाचा समावेश?
Sarfaraz Khand And Musheer KhanImage Credit source: PTI
| Updated on: Jun 17, 2025 | 11:39 AM
Share

क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून इंग्लंड दौऱ्याची प्रतिक्षा लागून आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने या मालिकेसाठी जोरदार तयारी केली आहे. शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया या मलिकेत खेळणार आहे. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या नव्या साखळीत विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या मालिकेत जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. तसेच अंडर 19 टीम इंडियाही या दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. वूमन्स सीनिअर टीम इंडियाही इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. या दरम्यान इंग्लंड दौऱ्यासाठी आणखी एक संघाची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई एमर्जिंग टीमचा इंग्लंड दौरा

मुंबई क्रिकेट असोसिएशनने इमर्जिंग टीमला इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएने इंग्लंड दौऱ्यासाठी टीम जाहीर केली आहे. या इंग्लंड दौऱ्यासाठी सूर्यांश शेडगे याला कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. मुंबई एमर्जिंग टीमचा 28 जूनपासून 1 महिन्याचा इंग्लंड दौरा असणार आहे. मुंबईची टीम या दौऱ्यात इंग्लंडमधील वेगवेगळ्या काउंटी आणि स्थानिक संघांविरुद्ध 5 दोन दिवसीय तर 4 वनडे मॅचेस खेळणार आहे. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव मिळावा. तसेच खेळाडूंना कमी वयातच तांत्रिक, धोरणात्मक आणि मानसिकरित्या चालना देणं हा या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी मुंबई एमर्जिंग संघात अनेक खेळाडूंचा समावेश आहे. यातील काही खेळाडू हे आयपीएलमध्येही खेळले आहेत. यात सूर्यांश शेडगे, सर्फराज खान याचा भाऊ मुशीर खान (पंजाब किंग्स) आणि अंगकृष रघुवंशी (कोलकाता नाईट रायडर्स) यांचा समावेश आहे. तसेच या संघातील काही खेळाडूंनी रणजी ट्रॉफीत मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे या खेळाडूंना इंग्लंड दौऱ्याचा चांगलाच फायदा होईल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मुंबईसमोर या संघांचं आव्हान

दरम्यान मुंबई टीमसमोर इंग्लंड दौऱ्यात अनेक संघांचं आव्हान असणार आहे. या संघांमध्ये नॉटिंघमशर, वॉर्सेस्टरशर, ग्लूस्टरशर, आणि काउंटी चँलेंजर्स संघांचं आव्हान असणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी मुंबई एमर्जिंग टीम :सूर्यांश शेडगे (कॅप्टन), वेदांत मुरकर (उपकर्णधार), अंगकृष रघुवंशी, आयुष वर्तक, आयुष जिमारे, हिमांशु सिंह, मनन भट्ट, मुशीर खान, निखिल गिरी, प्रग्नेश कनपिल्लेवार, प्रतीककुमार यादव, प्रेम देवकर, प्रिंस बदियानी, झैद पाटणकर, हृषिकेश गोरे आणि हर्षल जाधव.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.