
मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याला लागू पडते. वैभवने वयाच्या 14 व्या वर्षी असंख्य विक्रम केलेत. ज्या वयात इतर मुलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेत असतात त्या वयात वैभवने क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स केलेत. वैभवने 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केलं. वैभवने त्याच्या पदार्पणातील हंगामातच इतिहास घडवला. वैभव आयपीएल स्पर्धेत वेगवान शतक करणारा पहिलावहिला भारतीय ठरला. तसेच वैभवला रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी बिहार संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. थोडक्यात काय तर वैभवने कमी वयात यशाची शिखरं पादक्रांत केली आहेत. वैभव आता त्याच्या कारकीर्दीत आणखी 1 अविस्मरणीय कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.
वैभव आता टीम इंडियाच्या ब्लु जर्सीत खेळण्यासाठी तयार आला आहे. वैभवचं लवकरच टी 20 पदार्पण होणार आहे. येत्या काही दिवसात रायजिंग स्टार आशिया कप 2025 या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. वैभवची या स्पर्धेसाठी इंडिया ए टीममध्ये निवड करण्यात आली आहे. तर अमरावतीचा विकेटीकपर बॅट्समन जितेश शर्मा इंडिया ए संघाचं नेतृत्व करणार आहे. टी 20i आशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेला येत्या 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. वैभव या स्पर्धेत एक्शन मोडमध्ये दिसणार आहे.
आशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेत 14 ते 23 नोव्हेंबर दरम्यान 15 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये चुरस असणार आहे. टीम इंडिया या मोहिमेतील आपला पहिलाच सामना हा 14 नोव्हेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. वैभवने भारताचं 19 वर्षाखालील एकदिवसीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र वैभवची टी 20 क्रिकेटमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. या सामन्यात वैभवला संधी मिळाल्यास त्याचं पदार्पण होईल. अशाप्रकारे वैभवची ब्लु जर्सीत खेळण्याची ही पहिली वेळ ठरेल.
वैभवने आतापर्यंत 8 टी 20 सामने खेळले आहेत. वैभवने या 8 सामन्यांमध्ये 265 धावा केल्या आहेत. वैभवने 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. तसेच वैभवने टी 20 क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं आहे.
पहिला सामना, विरुद्ध यूएई, शुक्रवार, 14 नोव्हेंबर
दुसरा सामना, विरुद्ध पाकिस्तान, रविवार 19 नोव्हेंबर
तिसरा सामना, विरुद्ध ओमान, मंगळवार 18 नोव्हेंबर