MI vs DC IPL 2022: बुमराहचा जबरदस्त बाऊन्सर, पृथ्वी खाली पडला, तितक्यात इशान किशनने हेतू साध्य केला, पहा VIDEO

MI vs DC IPL 2022: बुमराहचा जबरदस्त बाऊन्सर, पृथ्वी खाली पडला, तितक्यात इशान किशनने हेतू साध्य केला, पहा VIDEO
Jasprit bumrah bouncer
Image Credit source: IPL

मुंबईने आजच्या सामन्यात सुरुवातही तशीच केली आहे. 50 धावात दिल्लीचे आघाडीच चार फलंदाज तंबूत परतले आहेत. आक्रमक सलमीवीर डेविड वॉर्नरला अवघ्या 5 रन्सवर डॅनियल सॅम्सने जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद केलं.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 21, 2022 | 8:47 PM

मुंबई: Mumbai Indians आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये वानखेडे स्टेडियमवर सामना सुरु आहे. IPL मधला हा 69 वा सामना आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात विजय मिळवला, तर त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे उघडतील. त्याचवेळी मुंबई इंडियन्सने बाजी मारली, तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (RCB) टीम प्लेऑफमध्ये पोहोचेल. मुंबई इंडियन्सच्या लेखी प्रतिष्ठा राखण्यासाठी विजय मिळवणं एवढच या सामन्याचं महत्त्वाचं आहे. पण दिल्ली आणि आरसीबीसाठी असं नाहीय. मुंबईने आज जिंकाव, अशी तमाम आरसीबीच्या चाहत्यांची इच्छा असेल.

पृथ्वी शॉ ला खाली पाडणारा जसप्रीत बुमराहचा तो बाऊन्सर चेंडू इथे क्लिक करुन पहा

मिचेल मार्शला आज भोपळाही फोडता आला नाही

मुंबईने आजच्या सामन्यात सुरुवातही तशीच केली आहे. 50 धावात दिल्लीचे आघाडीच चार फलंदाज तंबूत परतले आहेत. आक्रमक सलमीवीर डेविड वॉर्नरला अवघ्या 5 रन्सवर डॅनियल सॅम्सने जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद केलं. त्यानंतर मागच्या काही सामन्यात दमदार खेळ करणारा मिचेल मार्शला आज भोपळाही फोडता आला नाही. जसप्रीत बुमराहने त्याला कॅप्टन रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. रोहितने स्लीपमध्ये खूपच अप्रतिम झेल घेतला. रोहितकडून खूप दिवसांनी स्लीपमध्ये इतकं अप्रतिम क्षेत्ररक्षण पहायला मिळालं.

रोहित शर्माने स्लीपमध्ये खूप दिवसांनी अप्रतिम कॅच घेतली, एकदा ही विकेट इथे क्लिक करुन बघा

हे सुद्धा वाचा

बुमराहच्या बाऊन्सरसमोर पृथ्वी शॉ काहीच करु शकला नाही

पृथ्वी शॉ चांगली फलंदाजी करत होता. पण त्याला जसप्रीत बुमराहने बाऊन्सवर आऊट केलं. बुमराहने टाकलेला बाऊन्सर इतका जबरदस्त होता की, पृथ्वी शॉ ला तो खेळताच आला नाही. पृथ्वी हा बाऊन्सर फेस करताना, खाली पडला. चेंडू त्याच्या बॅटच्या दांड्याला लागून मागे गेला. विकेटकीपर इशान किशनने डाइव्ह मारुन झेल घेतला. पृथ्वीने 24 धावा केल्या. यात दोन चौकार आणि एक षटकार होता. मागच्या सामन्यात फटकेबाजी करणाऱ्या सर्फराज खानचं आज काही चाललं नाही. मयंक मार्कंडेच्या गोलंदाजीवर त्याने 10 धावावर इशानकडे झेल दिला. आता रोव्हमॅन पॉवेल आणि ऋषभ पंतच्या जोडीने डाव सावरला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें