MI vs DC IPL 2022: Mumbai Indians ची मॅच RCB साठी किती महत्त्वाची, ते तुम्हीच या फोटोमधून बघा

MI vs DC IPL 2022: Mumbai Indians ची मॅच RCB साठी किती महत्त्वाची, ते तुम्हीच या फोटोमधून बघा
RCB

MI vs DC IPL 2022: आरसीबीने सुद्धा हा सामना त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे दाखवण्यासाठी एक फोटो प्रसिद्ध केलाय. आरसीबीचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एकत्रपणे हा सामना पाहतायत.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 21, 2022 | 10:59 PM

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL) यंदाच्या सीजनमधला 69 वा सामना सुरु आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) या दोन टीममध्ये मॅच सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना जास्त महत्त्वाचा आहे. पण त्याचवेळी आणखी एका संघासाठी सुद्धा ही मॅच महत्त्वाची आहे. त्यांचे या सामन्याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं या निकालाकडे लक्ष आहे. कारण मुंबई इंडियन्स जिंकली, तर त्यांचा प्लेऑफ म्हणजे अंतिम चारमध्ये प्रवेश होईल. मुंबईचा पराभव त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणेल. आज RCB चा संघही मुंबईच्या विजयासाठी प्रार्थना करतोय. ते चिअर करतायत. आरसीबी कॅम्पमध्ये सध्या काय स्थिती आहे, त्यावर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.

RCB ने पोस्ट केला फोटो

आरसीबीने सुद्धा हा सामना त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे दाखवण्यासाठी एक फोटो प्रसिद्ध केलाय. आरसीबीचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एकत्रपणे हा सामना पाहतायत. सर्वांचे चेहरे आनंदी दिसतायत. आरसीबीला प्लेऑफचं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी गुजरात टायटन्सवर विजय आवश्यक होता. ते काम त्यांनी चोख बजावलं. आता सर्व काही मुंबई इंडियन्सवर आहे. दिल्लीसाठी हा सामना ‘करो या मरोच’ आहे. RCB च्या फॅन्सनी मुंबईच्या विजयासाठी प्रार्थना सुरु आहे.

मुंबईला 160 धावांचं टार्गेट

दिल्लीने सामना जिंकला, तर त्यांचे 16 पॉइंट्स होतील. नेट रनरेट त्यांचा आरसीबीपेक्षा चांगला आहे. त्यामुळे सहाजिकच प्लेऑफसाठी ते पात्र ठरतील. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 159 धावा केल्या आहेत. Mumbai Indians ला विजयासाठी 160 धावांची आवश्यकता आहे.मुंबईने आजच्या सामन्यात सुरुवात चांगली केली होती. 50 धावात दिल्लीचे आघाडीच चार फलंदाज तंबूत परतले होते. पण पाचव्या विकेटसाठी रोव्हमॅन पॉवेल आणि कॅप्टन ऋषभ पंतने 75 धावांची भागीदारी केली. पॉवेल आणि पंतने दिल्लीचा डाव सावरला. रोव्हमॅन पॉवेलने 34 चेंडूत 43 धावांची खेळी केली. यात एक चौकार आणि चार षटकार आहेत. ऋषभने 33 चेंडूत 39 धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें