AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs KKR Playing XI IPL 2022: दिग्गज फलंदाजाचं मुंबईच्या संघात कमबॅक, कोलकात्याचा तोफखाना मजबूत होणार! अशी असेल प्लेईंग 11

इंडीयन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सध्याचा सीझन आतापर्यंत चांगला गेला नाही. आयपीएल 2022 मध्ये या संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

MI vs KKR Playing XI IPL 2022: दिग्गज फलंदाजाचं मुंबईच्या संघात कमबॅक, कोलकात्याचा तोफखाना मजबूत होणार! अशी असेल प्लेईंग 11
Mumbai Indians, Kolkata Knight riders Image Credit source: IPL
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 06, 2022 | 1:20 PM
Share

मुंबई : इंडीयन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सध्याचा सीझन आतापर्यंत चांगला गेला नाही. आयपीएल 2022 मध्ये या संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. असं असलं तरी मुंबईच्या संघाला सुरुवातीच्या सामन्यात पराभूत होण्याची वाईट सवय आहे, गेल्या 10 वर्षांमध्ये एकदाही या संघाने स्पर्धेतला पहिला सामना जिंकलेला नाही. मुंबईबद्दल असं म्हटलं जातं की हा संघ धिमी सुरुवात करतो आणि नंतर वेग पकडतो. मुंबईचा असा खेळ यापूर्वी आपण अनेकदा पाहिला आहे. गेल्या 10 वर्षात या संघाने एकदाही स्पर्धेचा पहिला सामना जिंकला नसला तरी या 10 वर्षात मुंबईने 5 वेळा आयपीएल चषक उंचावला आहे. असे अनेक सीझन आले ज्यात मुंबईच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि त्यानंतर या संघाने पुनरागमन करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. या हंगामातही संघाच्या चाहत्यांना अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. मोसमातील तिसऱ्या सामन्यात या संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदादेखील आयपीएलची सुरुवात मुंबईसाठी खूपच खराब झाली असली तरी कोलकात्याने मात्र यंदाच्या मोसमाची दिमाखात सुरुवात केली आहे. कोलकात्याने आत्तापर्यंत तीन सामने खेळले असून या तीन सामन्यांपैकी दोन सामने त्यांनी जिंकले आहेत आणि तर एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. गुणतालिकेत हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईविरुद्ध कोलकाता आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. जर मुंबईविरुद्ध कोलकात्याला विजय मिळवता आला तर हा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेईल. मात्र मुंबई आणि कोलकाता संघांमधील आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर कोणीही म्हणेल की मुंबईला हरवणं कोलकात्यासाठी खूप अवघड आहे.

सूर्यकुमारचं कमबॅक होणार?

स्पर्धेतील आतापर्यंतची स्थिती पाहता मुंबईचा संघ कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात काही बदल करू शकतो. सूर्यकुमार यादव संघात आल्यास संघ मजबूत होईल. मागील सामन्यापूर्वी झहीर खानने सांगितले होते की, सूर्यकुमार निवडीसाठी उपलब्ध आहे पण तो त्या सामन्यात खेळला नाही. आता तो पुढच्या सामन्यात खेळतो की नाही हे पाहावे लागेल. तो संघात आला तर अनमोप्रीत सिंगला बाहेर जावे लागू शकते. मागील सामन्यांमध्ये बेसिल थम्पी चांगलाच महागडा ठरला होता. त्यामुळे त्याचे संघाबाहेर जाणेही निश्चित असल्याचे मानले जाते. त्याच्या जागी रोहित शर्मा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संधी देऊ शकतो.

कोलकात्याच्या संघात बदल होणार!

कोलकात्याच्या संघाबद्दल बोलायचे झाले, तर ते गेल्या सामन्यात पंजाब किंग्जला पराभूत केल्यानंतर ते आता मुंबईशी दोन हात करणार आहेत. संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे आणि अशा परिस्थितीत संघात फारसे बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स संघातील निवडीसाठी उपलब्ध झाल्यास तो निश्चितपणे संघात येईल आणि टीम साऊथीला त्याच्यासाठी बलिदान द्यावे लागेल.

दोन्ही संघांची संभाव्या प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, जयदेव उनाडकट.

कोलकाता नाइट रायडर्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज, नितीश राणा, आंद्रे रसेल, टिम साऊदी/पॅट कमिन्स, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी.

इतर बातम्या

Virat Kohli Runout IPL 2022: सॅमसनचा सुपरमॅन थ्रो, चहलची चालाकी आणि विराट RUNOUT पहा VIDEO

IPL 2022 points table : राजस्थान पराभवानंतरही पहिल्या स्थानी, IPLमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

IPL 2022, Orange Cap : इशानची सत्ता गेली, ऑरेंज कॅपवर आता ‘बटलर’राज, पर्पल कॅपच्या यादीतही बदल

Follow Us
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल