AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, Orange Cap : इशानची सत्ता गेली, ऑरेंज कॅपवर आता ‘बटलर’राज, पर्पल कॅपच्या यादीतही बदल

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. काल RR vs RCBमध्ये आपीएल 2022चा तेरावा सामना झाला. संजू सॅमसनच्या राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोर संघाने ‘रॉयल‘ विजय मिळवला.  यानंतर पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या यादीत पुन्हा एकदा बदल झाले आहेत.

IPL 2022, Orange Cap : इशानची सत्ता गेली, ऑरेंज कॅपवर आता 'बटलर'राज, पर्पल कॅपच्या यादीतही बदल
ऑरेंज कॅपवर आता 'बटलर'राजImage Credit source: tv9
| Updated on: Apr 06, 2022 | 6:33 AM
Share

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या तेराव्या सामन्यात संजू सॅमसनच्या (Sanju Samson) राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोर संघाने ‘रॉयल‘ विजय (RR vs RCB) मिळवला. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मंगळवारी एक रंगतदार सामना पहायला मिळाला. रोलरकोस्टर सारखे अनेक चढ-उतार या सामन्यामध्ये होते. चांगल्या सुरुवातीनंतर RCB चा संघ एका टप्प्यावर सामना गमावतोय असं दिसतं होतं. पण अनुभव दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शाहबाज अहमदच्या साथीने सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. टी 20 क्रिकेटमधली खरी रंगत या सामन्यामधून अनुभवता आली. टी 20 तुम्ही वेगवान सुरुवात करा किंवा धीमी. सामन्याचा नूर पालटण्यासाठी एक-दोन षटक पुरेशी असतात. तेच आजच्या सामन्यात घडलं. तत्पूर्वी आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसीसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं हेतं. या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीमध्ये बदल झाला.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण?

मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या तेराव्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत बदल झालाय. मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर जोस बटलरने दमदार फलंदाजी केली. बटलरच्या फलंदाजीमुळेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्सला निर्धारीत 20 ओव्हर्समध्ये 169 पर्यंत पोहोचता आले. जोस बटलरने मागच्या दोन सामन्यांप्रमाणे मंगळवारी आक्रमक सुरुवात केली नाही. यानंतर बटलरचे एकूण 205 धावा झाल्या असून तो ऑरेंज कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर इशान कायम असू त्याने 135 धावा काढल्या आहेत. त्यानंतर फाफ डु प्लेसीस या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला असून त्याने आतापर्यंत  122 धावा काढल्यायेत. त्यानंतर लखनौचा दीपक हुडा चौथ्या क्रमांकावर आला असून त्याने 119 धावा केल्या आहेत. शिमरॉन हेटमायर याने 109 धाव केल्याने तो पाचव्या स्थानावर आहे.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच फलंदाज

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. पर्पल कॅपच्या शर्यतीत कोलकाता नाईट रायडर्सचा उमेश यादव पहिल्या क्रमांकावर आहे. आरसीबी आणि आरआर या दोन्ही संघाच्या सामन्यानंतर युजवेंद्र चहल यांच्या सात विकेट झाल्या असून तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यानंतर लखनौचा आवेश खान तिसऱ्या क्रमांकावर त्याने घेतलेल्या विकेटची संख्या सात आहे. तर चौथ्या स्थानावर पंजाब किंग्सचा राहुल चहर असून त्याने सहा विकेट घेतल्या आहेत. पाचव्या स्थानावर वानेंदु असून त्याने सहा विकेट घेतल्या आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा 24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक 22444
कुलदीप यादव21419

ऑरेंज आणि पर्पल कॅप म्हणजे काय?

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

इतर बातम्या

तुम्हालाही क्रेडिट कार्ड हवय? मग आधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Basmati Rice: बासमती तांदळाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा, कृषी शास्त्रज्ञांची संशोधन आले कामी..!

घरांच्या किमती वाढल्या; जाणून घ्या का वाढतायेत घरांचे दर?

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.