
आयपीएल स्पर्धेतील 33 वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. हा सामना कोण जिंकेल शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला माहिती नव्हतं. एकवेळ अशी होती की सामना पूर्णपणे मुंबईच्या पारड्यात झुकलेला होता. मात्र आशुतोष शर्माच्या वादळी खेळीने मुंबईचं टेन्शन वाढलं. त्याला बाद करण्याचे सर्व प्रयत्न फसले होते. त्यानंतर 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात झेल बाद झाला आणि सामना फिरला. त्यानंतरही ब्रारने सामन्यात रंगत आणली होती. तसेच रबाडाने एक षटकार मारताच मुंबईचा रंग उडाला होता. पण दोन धावा घेताना धावचीत झाला आणि मुंंबईने सामना 9 धावांनी जिंकला.
मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला 9 धावांनी विजय मिळवला आहे. आशुतोष शर्माने विजयाच्या वेशीवर पंंजाबला आणून ठेवलं आहे. पण अखेर मुंबई इंडियन्सच्या पारड्यात विजय पडला आहे.
हरप्रीत ब्रारला बाद करण्यात हार्दिक पांड्याला यश आलं आहे. हरप्रीत ब्रार मोक्याच्या क्षणी झेल बाद झाला.
आशुतोष शर्मा 61 धावा करून कोएत्झीच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. त्यामुळे सामन्याची स्थिती दोलयामान झाली आहे. कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
आशुतोष शर्माने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची हवा काढली. आशुतोष शर्माने 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं.
पंजाबच्या आशा पूर्णत: शशांक सिंगवर टिकल्या होत्या. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण जसप्रीत बुमराहने त्याचा डाव हाणून पाडला.
आकाश मढवालच्या गोलंदाजीवर जितेश शर्मा 9 धावा करून बाद झाला. डायरेक्ट बॉल खेळताना चूक झाली आणि थेट पॅडवर आदळला. पंचांनी त्याला पायचीत दिलं.
हरप्रीत सिंग भाटीयाच्या रुपाने पंजाबला पाचवा धक्का बसला आहे. 13 धावांवर असताना त्याला श्रेयस गोपाळने बाद केलं.
पंजाब किंग्सला लिविंगस्टोनच्या रुपाने चौथा धक्का बसला आहे. कोएत्झीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
जसप्रीत बुमराहने पंजाब किंग्सला बॅकफूटवर ढकललं आहे. एकाच षटकात दोन गडी बाद केले. रिली रोस्सोला बाद केल्यानंतर सॅम करनला तंबूत पाठवलं.
जसप्रीत बुमराहच्या भेदक यॉर्कवर रिली रोस्सोच्या दांड्या उडाल्या. त्याला चेंडूच कळला नाही. रोस्सो फक्त 1 धाव करून तंबूत परतला.
पंजाब किंग्सला प्रभसिमरन सिंगच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. गेराल्ड कोएत्झीच्या गोलंदाजीवर इशान किशनने त्याचा झेल पकडला. त्याला आपलं खातही खोलता आलं नाही.
मुंबई इंडियन्सने 7 गडी गमवून 192 धावा केल्या आणि विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान पंजाब किंग्स गाठते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शेवटच्या जोरदार फटकेबाजी करताना रोमारियो शेफर्डचा शॉट हुकला आणि अवघी 1 धाव करून बाद झाला.
टीम डेविड 6 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. त्याने 2 चौकार आणि एक षटकार मारला.
कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा फलंदाजीत फेल ठरला आहे. 6 चेंडूत खेळत 10 धावा केल्या आणि बाद झाला. हर्षल पटेलने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
सूर्यकुमार यादव 78 धावा करून बाद झाला आहे. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे संघाची धावसंख्या 140 च्या पार गेली आहे.
रोहित शर्मा 25 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. यात 3 षटकार आणि 2 चौकार मारले. सॅम करनच्या गोलंदाजीवर हरप्रीत ब्रारने झेल पकडला.
रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे. पण झटपट धावांना काही अंशी ब्रेक लागला आहे.
पॉवर प्लेच्या सहा षटकांमध्ये मुंबई इंडियन्सने सावध सुरुवात केली. इशान किशन 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार आणि रोहित शर्माने डाव सावरला. तसेच 1 बाद 54 धावा केल्या.
इशान किशन 8 धावांवर असताना रबाडाच्या गोलंदाजीवर उत्तुंग शॉट मारत बाद झाला. ब्रारने झेल पकडण्यात कोणतीही चूक केली नाही.
रोहित शर्मा आणि इशान किशनने मुंबई इंडियन्सला सावध सुरुवात करून दिली आहे. 2 षटकात बिनबाद 18 धावा झाल्या आहेत.
रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकत गोलंदाजी निवडली आहे.
मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, मधवाल, देवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वढेरा, हार्विक देसाई, शम्स मुलानी, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, नुवान तुषारा, क्वेना माफाका, ल्यूक वुड, पियुष चावला.
पंजाब किंग्स संघ: अथर्व तायडे, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर, विदाथ कावरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया, नॅथन एलिस, तनय थियागराजन, शिवम सिंग, शिखर धवन, रिले रोसो, ख्रिस वोक्स, ऋषी धवन, सिकंदर रझा, प्रिन्स चौधरी, विश्वनाथ सिंग.
दोन्ही संघ आयपीएलमध्ये 31 वेळा आमनेसामने आले आहेत. यात मुंबई इंडियन्सने 16, तर पंजाब किंग्सने 15 वेळा बाजी मारली आहे.
पंजाब आणि मुंबई या दोन्ही संघांची स्पर्धेतील वाटचाल जवळपास सारखी आहे. दोन्ही संघांनी मागील सामने गमावले आहेत. तसेच चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. या सामन्यात कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे खेळणार नसून सॅम करनकडे धुरा आहे. तर मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफसाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा ठरेल.