AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs PBKS Playing XI IPL 2022: ‘परिस्थिती कठीण आहे, पण…’ Mumbai Indians च्या टीममध्ये एकमेव बदल

MI vs PBKS Playing XI IPL 2022: आयपीएल 2022 मध्ये आज मुंबई इंइियन्सचा पंजाब किंग्स (MI vs PBKS) विरुद्ध सामना होत आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

MI vs PBKS Playing XI IPL 2022: 'परिस्थिती कठीण आहे, पण...' Mumbai Indians च्या टीममध्ये एकमेव बदल
मुंबई इंडियन्स कॅप्टन रोहित शर्मा Image Credit source: PTI
| Updated on: Apr 13, 2022 | 7:39 PM
Share

मुंबई: आयपीएल 2022 मध्ये आज मुंबई इंइियन्सचा पंजाब किंग्स (MI vs PBKS) विरुद्ध सामना होत आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. पहिल्या चारही सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्सने आज पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्याआधी संघात एकमेव बदल केला आहे. रमणदीपच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सचा समावेश केला आहे. मुंबईचे चार सामने झाले असून चारही सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. पंजाब किंग्सने आपल्या संघात एकही बदल केलेला नाही.

मुंबईच्या तुलनेत पंजाब किंग्सचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चार पैकी दोन सामन्यात त्यांचा विजय आणि दोन मॅचमध्ये पराभव झाला आहे. पंजाबची नजर तिसऱ्या विजयावर आहे. गुणतालिकेत पंजाबचा संघ सातव्या तर मुंबई इंडियन्स शेवटच्या स्थानी आहे.

टॉस जिंकल्यानंतर रोहित काय म्हणाला?

“मी संघातील खेळाडूंना एवढच सांगितलय की, सकारात्मक रहा, हार मानू नका. ही कठीण परिस्थिती आहे. पण आम्हाला मेहनत करायची आणि सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याची गरज आहे” असं रोहितने सांगितलं.

टॉस जिंकल्यानंतर रोहित म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार. आधीसारखाच पीच वाटतोय. आम्ही यावर खेळलो आहोत. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळेल. लक्ष केंद्रीत ठेवणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे”. असा आहे मुंबईचा संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, बसिल थम्पी,

अशी आहे पंजाब किंग्सची Playing -11 मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंह

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.