AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RR IPL 2023 : Suryakumar Yadav कडून मैदानात शिवीगाळ? XXXX, VIDEO व्हायरल

MI vs RR IPL 2023 : खरंतर, टिम डेविडच्या बरोबरीने सूर्यकुमार यादव सुद्धा मुंबई इंडियन्सच्या विजयाचा हिरो आहे. पण सूर्यकुमारची बाद झाल्यानंतरची कृती अनेकांना खटकली.

MI vs RR IPL 2023 : Suryakumar Yadav कडून मैदानात शिवीगाळ? XXXX, VIDEO व्हायरल
| Updated on: May 01, 2023 | 8:28 AM
Share

मुंबई : मुंबई इंडियन्सने काल महत्वाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सला विजय आवश्यक होता. मुंबई इंडियन्सने 6 विकेट आणि 3 चेंडू राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सच्या या विजयात टिम डेविडच्या बरोबरीने सूर्यकुमार यादवने सुद्धा महत्वाची भूमिका बजावली. वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमधील हा 42 वा सामना झाला. सूर्याने काल अर्धशतकी खेळी केली.

कॅप्टन रोहित शर्मा (3) स्वस्तात तंबूत परतल्यानंतर सूर्यकुमार यादवने मधल्याफळीत महत्वाची भूमिका बजावली. काल मुंबईकडून कॅमरुन ग्रीन (44), टिम डेविड नाबाद (45), तिलक वर्मा नाबाद (29) आणि सूर्यकुमारने 29 चेंडूत 55 धावांची खेळी केली.

Reaction सोशल मीडियावर व्हायरल

राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 213 धावांच विशाल लक्ष्य ठेवलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना चांगली धावगती राखणं गरजेच होतं. मधल्याफळीत सूर्याने आपलं काम चोख बजावलं. त्याने 8 फोर आणि 2 सिक्स मारले. सूर्या चांगला खेळला पण बाद झाल्यानंतरची त्याची Reaction सोशल मीडियावर व्हायरल झालीय.

तोंडून अपशब्द निघाले ?

सूर्यकुमार जबरदस्त खेळत असताना बाऊल्टच्या बॉलिंगवर OUT झाला. संदीप शर्माने पळत जाऊन त्याचा सुंदर झेल घेतला. बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना, सूर्या नाराज झाला होता. संताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यावेळी त्याच्या तोंडून काही अपशब्द निघाल्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतय. सूर्यकुमार सारख्या प्लेयरकडून अशी अपेक्षा नाहीय

खरंतर, टिम डेविडच्या बरोबरीने सूर्यकुमार यादव सुद्धा मुंबई इंडियन्सच्या विजयाचा हिरो आहे. पण सूर्यकुमारची बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतानाची कृती अनेकांना खटकली. सूर्यकुमार यादव सारख्या प्लेयरकडून अशी अपेक्षा नाहीय. मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचायच असेल, तर पुढच्या काही सामन्यात अशीच सूर्यकुमार यादवची बॅट तळपणं आवश्यक आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.