MI vs RR : रोहित भर सामन्यात सर्वांसमोर कुणाला घाबरला? व्हीडिओ व्हायरल

Rohit Sharma Ipl 2024 : आपल्या आक्रमक बॅटिंगने प्रतिस्पर्धी संघाची हवा टाईट करणारा रोहित शर्मा राजस्थान विरुद्धच्या सामन्यात नक्की कुणाला घाबरला? पाहा व्हीडिओ.

MI vs RR : रोहित भर सामन्यात सर्वांसमोर कुणाला घाबरला? व्हीडिओ व्हायरल
| Updated on: Apr 01, 2024 | 11:04 PM

रोहित शर्मा आयपीएलच्या 17 व्या मोसमात राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना आपल्या होम ग्राउंडवर अपयशी ठरला. मुंबईचा या हंगामातील तिसरा आणि होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवरील पहिला सामना राजस्थान विरुद्ध होता. त्यामुळे रोहितकडून क्रिकेच चाहत्यांना विस्फोटक खेळीची अपेक्षा होती. राजस्थान कॅप्टन संजू सॅमसन याने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. त्यामुळे रोहितची बॅटिंग सामन्यातील पहिल्याच डावात पाहायला मिळणार असल्याने क्रिकेट चाहते उत्सुक होते. मात्र ट्रेंट बोल्ट क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्षेवर पाणी फेरलं.

ट्रेंट बोल्टने सामन्यातील पहिल्याच बॉलवर रोहितला विकेटकीपर संजू सॅमसन याच्या हाती कॅच आऊट केलं. रोहितची आयपीएलमध्ये झिरोवर आऊट होण्याची ही 17 वी वेळ ठरली. रोहितने दिनेश कार्तिक याच्या 17 वेळा झिरोवर बाद होण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यामुळे रोहितच्या कारकीर्दीला डाग लागला.

मुंबईच्या 125 धावा

मुंबईने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 125 धावा केल्या. त्यामुळे राजस्थानला 126 धावांचं आव्हान मिळालं. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. राजस्थान बॅटिंगसाठी मैदानात आली. या दरम्यान मैदानात रोहित शर्माचा चाहता सुरक्षा भेदून मैदानात घुसला. त्या चाहत्याने विकेटकीपर ईशानच्या बाजूला स्लिपमध्ये असलेल्या रोहितच्या दिशेने धाव घेतली. हा चाहता जेव्हा रोहितत्या जवळ पोहचला तेव्हा रोहित उडाला. त्यानंतर त्या चाहत्यांने रोहितला मीठी मारली आणि हात मिळवला. रोहितनंतर त्या चाहत्याने ईशानकडे मोर्चा वळवला. ईशानसोबत हस्तांदोलन केलं. ईशानकडे जेव्हा हा चाहता गेला तेव्हा रोहित हसला.

रोहितचा चाहता

रोहित आणि ईशानला जवळून पाहिल्यानंतर आणि मीठी मारल्यानंतर त्या चाहत्याने एकच जल्लोष केला. त्यानंतर हा चाहता मैदानाबाहेर धावत निघाला. चाहत्याच्या तोंडावर जग जिंकल्याचे भाव होते. रोहित-ईशान आणि या चाहत्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह आणि क्वेना मफाका.

राजस्थान रॉयल्स प्लेईंग ईलेव्हन : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर आणि युझवेंद्र चहल.