AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs RCB : कर्णधार विराट कोहली याच्याकडून ‘या’ खेळाडूच्या विकेटनंतर शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल

आजचा सामना संपल्यानंतर विराट कोहली याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळतल आहे.

PBKS vs RCB : कर्णधार विराट कोहली याच्याकडून 'या' खेळाडूच्या विकेटनंतर शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Apr 20, 2023 | 8:13 PM
Share

मुंबई :  पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये आरसीबीने 24 धावांनी विजय मिळवला आहे. सामना शेवटच्या काही ओव्हर्समध्ये पंजाबच्या बाजूने झुकलेला दिसत होता. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांनी केलेल्या कमाल कामगिरीच्या जोरावर त्यांनी पंजाबचा पराभव केला. आजचा सामना संपल्यानंतर विराट कोहली याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळतल आहे. ज्यामध्ये विराट पंजाबच्या संघाची विकेट गेल्यावर उत्साहामध्ये तिथे शिवी देत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

पाहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

मोहम्मद सिराज याने 6 व्या ओव्हरमध्ये पंजाबचा हरप्रीत सिंग भाटियाला रनआऊट केलं. भाटिया धाव घेण्याच्या नादात मिडऑफला उभ्या असलेल्या सिराजच्या डायरेक्ट थ्रोमुळे बाद झाला. अवघ्या काही सेकंदांमध्ये सिराजने त्याला तंबूचा मार्ग दाखवला. मात्र त्यानंतर विराटने आक्रळास्तेपणा दाखवत शिवीगाळ केली. नेटकऱ्यांनी यावरून त्याला ट्रोल केलं आहे.

आरसीबीने  प्रथम फलंदाजी करताना 174 धावा  केल्या होत्या. यामध्ये विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 137 धावांची भागीदारी केली. विराट कोहली 47 चेंडूत 59 धावा करून बाद झाला. तर फाफने 56 चेंडूत 84 धावा केल्या  होत्या. आरसीबीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची खराब सुरूवात झाली होती. यामध्ये सर्वात म्हणजे पंजाबने आपले दोन खेळाडू रन आऊटच्या रूपात गमावले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग

महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.