Mohammad Siraj : मोहम्मद सिराज ट्रोल! काहींनी घेतली बाजू, काहींनी केलं ट्रोल,आरसीबीच्या डायरेक्टरचंही मोठ वक्तव्य

सोशल मीडियावर काहींना सिराजवर टीका केली आहे. तर काहींनी त्याच्या बाजूनं मत मांडलंय.

Mohammad Siraj : मोहम्मद सिराज ट्रोल! काहींनी घेतली बाजू, काहींनी केलं ट्रोल,आरसीबीच्या डायरेक्टरचंही मोठ वक्तव्य
Mohammad Siraj
Image Credit source: social
शुभम कुलकर्णी

|

May 29, 2022 | 12:35 PM

मुंबई :  एखादा सामना हरला की लगेच सोशल मीडियावर (Social media) खेळाडुंला टार्गेट केलं जातं. ते ट्रोलही होतात. असेच प्रकार मागच्या काही काळात घडले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) चाहत्यांच्या निशाण्यावर आलाय. सोशल मीडियावर मोहम्मद सिराजला खूप ट्रोल केलं जात होतं. तर काही चाहत्यांनी सिराजची बाजूही घेतली. अनेकांनी त्याची बाजू सोशल मीडियावर मांडली आहे. कुणी फेसबुक पोस्ट केली आहे तर कुणी ट्विट केलंय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचागोलंदाज मोहम्मद सिराज राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या क्वालिफायर-2 मध्ये चांगलाच महागात पडला. या षटकात सिराजने फक्त 2 षटके टाकली. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी सिराजच्या 2 षटकात 31 धावा केल्या. दरम्यान, क्रिकेटचे संचालक, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) माईक हेसन यांनी मोहम्मद सिराजला मोठं वक्तव्य केलंय.

चाहते काय म्हणतायेत?

‘आत्मविश्वास कमी’

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी सांगितलं की, ‘या सामन्यानंतर मोहम्मद सिराजचा आत्मविश्वास नक्कीच कमी झालाय. तो लवकरच जोरदार पुनरागमन करेल. मोहम्मद सिराज चांगला गोलंदाज आहे. पण हा मोसम त्याच्यासाठी चांगला राहिला नाही. मात्र, आगामी काळात तो जोरदार पुनरागमन करेल. या मोसमात तो नवीन चेंडूवर सिराजचा स्विंग करण्यात तसेच विकेट घेण्यात अपयशी ठरला,’ असंही हेसन म्हणालेत.

सोशल मीडियावर काय बोललं जातंय?

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर काहींना सिराजवर टीका केली आहे. तर काहींनी त्याच्या बाजूनं मत मांडलंय. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी देखील थोडी नाराजी दाखवत पुन्हा तो चांगलं पुनरागमन करणार असल्याचं म्हटलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें