AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPL 2023 RJ vs CSK | धोनीचा सहकारी पुन्हा अपयशी, 15 चेंडूत रत्नागिरीच्या दिव्यांगने CSK विरुद्ध मॅचची दिशा बदलली

MPL 2023 RJ vs CSK | दिव्यांग हिंगणेकरची तुफान बॅटिंग. दिव्यांगने आपल्या खेळाने मन जिंकून घेतलं. तो टॉप ऑर्डरमध्ये आला असता, तर चित्र अजून वेगळं दिसलं असतं. या मुलाने 15 चेंडूत कमाल केली.

MPL 2023 RJ vs CSK | धोनीचा सहकारी पुन्हा अपयशी, 15 चेंडूत रत्नागिरीच्या दिव्यांगने CSK विरुद्ध मॅचची दिशा बदलली
CSK Captain Ms DhoniImage Credit source: PTI
| Updated on: Jun 21, 2023 | 7:59 AM
Share

पुणे : महाराष्ट्र प्रिमीअर लीग स्पर्धेत मंगळवारी डबल हेडर सामने झाले. पहिला सामना कोल्हापूर टस्कर्स आणि सोलापूर रॉयल्समध्ये झाला. या मॅचमध्ये कोल्हापूरने सोलापूरवर 26 धावांनी आरामात विजय मिळवला. दिवसातील दुसरा सामना रत्नागिरी जेट्स आणि छत्रपती संभाजी किंग्समध्ये झाला. महाराष्ट्र प्रिमीअर लीग स्पर्धेतील हा 9 वा सामना होता. MPL 2023 स्पर्धेत महाराष्ट्रातील युवा खेळाडू आपली छाप उमटवतायत. IPL च्या धर्तीवर सुरु झालेल्या या T20 लीग क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन सेंच्युरी पाहायला मिळाल्या आहेत.

अंकित बावने आणि अर्शिन कुलकर्णी या दोन युवा खेळाडूंनी शतकी खेळी केली. कालच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी जेट्सने पहिली बॅटिंग केली.

दिव्यांग हिंगणेकरचा मन जिंकून घेणारा खेळ

रत्नागिरीकडून अझीम काझीने 47 चेंडूत 53 धावा, निखिल नाईक 25 चेंडूत 38 धावा आणि दिव्यांग हिंगणेकरने नाबाद 46 धावा केल्या. रत्नागिरी जेट्सकडून दिव्यांग हिंगणेकरने मन जिंकून घेणारा खेळ केला. त्याने तुफान फटेकबाजी केली. अवघ्या 15 चेंडूत 46 धावा चोपल्या. यात 2 फोर, 5 सिक्स आहे. तो लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी आला होता. त्याच्या फटेकबाजीमुळेच रत्नागिरी जेट्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 173 धावा केल्या.

धोनीचा सहकारी अपयशी

या मॅचमध्ये छत्रपती संभाजी किंग्सकडून खेळणारा राज्यवर्धन हंगरगेकर पुन्हा एकदा गोलंदाजीत फेल ठरला. त्याने 4 ओव्हर्समध्ये 27 धावा दिल्या. पण एकही विकेट काढला नाही. राज्यवर्धन अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा भाग होता. आता तो आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. भविष्य़ातील खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण MPL 2023 मध्ये त्याला लौकीकाला साजेसी कामगिरी करता आलेली नाही. बॅटिंगमध्ये 3 सिक्स मारुन त्याने 8 चेंडूत 21 धावा केल्या. पण त्याचा टीमला उपयोग झाला नाही. CSK कडून कोण चांगलं खेळलं?

रत्नागिरी जेट्सच्या 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना छत्रपती संभाजी किंग्सकडून ओमकार खटपेने 48 चेंडूत सर्वाधिक 60 धावा केल्या. यात 4 फोर, 2 सिक्स आहेत. ओम भोसले 20, शमशुझमा काझी 27 आणि राज्यवर्धन हंगरगेकर 21 धावांची खेळी केली. CSK कडून कोणी मॅचविनिंग खेळी केली नाही. निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 156 धावा केल्या. रत्नागिरी जेट्सने छत्रपती संभाजी किंग्सवर 17 धावांनी आरामात विजय मिळवला.

Follow Us
शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ, छत्रपती संभाजीनगर...
ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन