AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPL 2023 RJ vs ENT | अर्शिन कुलकर्णीशिवाय मैदानात उतरलेल्या नाशिक टायटन्सला पहिला झटका

MPL 2023 RJ vs ENT | ईगल नाशिक टायटन्स टीमच महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन सुरु आहे. राहुल त्रिपाठी आणि अर्शिन कुलकर्णी हे दोन खेळाडू ईगल नाशिक टायटन्सचे मुख्य आधारस्तंभ आहेत.

MPL 2023 RJ vs ENT | अर्शिन कुलकर्णीशिवाय मैदानात उतरलेल्या नाशिक टायटन्सला पहिला झटका
MPL 2023 RJ vs ENTImage Credit source: twitter
| Updated on: Jun 22, 2023 | 7:55 AM
Share

पुणे : महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी 10 वा सामना झाला. ईगल नाशिक टायटन्स आणि रत्नागिरी जेट्सची टीम आमने-सामने होती. ईगल नाशिक टायटन्स टीमने आतापर्यंत या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केलीय. साखळी फेरीतील तीन पैकी तीन सामने जिंकत अव्वल स्थानी आहे. राहुल त्रिपाठी आणि अर्शिन कुलकर्णी या दोन खेळाडूंवर नाशिकची टीम प्रामुख्याने अवलंबून आहे. राहुल त्रिपाठी टीम इंडियाकडून खेळतो.

कालच्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सची टीम शतकवीर अर्शिन कुलकर्णीशिवाय मैदानात उतरली होती. ईगल नाशिक टायटन्सच्या या आधीच्या सामन्यात अर्शिन कुलकर्णीने पुणेरी बाप्पा टीम विरुद्ध 54 चेंडूत 117 धावा फटकावल्या. यात त्याने 3 फोर, 13 सिक्स होते.

धीरज फटांगरेने किती धावा केल्या?

रत्नागिरी जेट्स विरुद्धच्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स टीमला MPL 2023 स्पर्धेत पहिला झटका बसला. नाशिकची विजयी घोडदौड रत्नागिरी जेट्सने रोखली. या मॅचमध्ये रत्नागिरी जेट्सने पहिली बॅटिंग केली. ओपनर धीरज फटांगरेने जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने 51 चेंडूत 70 धावा फटकावल्या. यात 6 फोर, 4 सिक्स होते. प्रीतम पाटील 19 चेंडूत 33 आणि निखिल नाईकने 28 चेंडूत 41 धावा केल्या. या तिघांच्या फलंदाजीच्या बळावर रत्नागिरी जेट्सने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 200 धावा चोपल्या.

मंदार भंडारी 8 फोर, 4 सिक्स

या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ईगल नाशिक टायटन्स टीमला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. 32 धावांवर हर्षद खाडीवलेच्या रुपाने पहिला झटका बसला. त्याने 9 चेंडूत 8 धावा केल्या. विकेटकीपर मंदार भंडारीने मात्र जबरदस्त प्रदर्शन केलं. सलामीला आलेल्या मंदारने 39 चेंडूत 74 धावा चोपल्या. त्याने 8 फोर, 4 सिक्स मारले. राहुल त्रिपाठीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. राहुल त्रिपाठीने 20 चेंडूत 24 धावा केल्या. कोण जिंकलं?

कौशल तांबेने 17 चेंडूत 22 धावा केल्या. धनराज शिंदेने अखेरीस फटकेबाजी केली. 3 सिक्स, 2 फोरसह नाबाद 43 धावा केल्या. पण त्याला विजयी लक्ष्य गाठता आलं नाही. नाशिकने 5 बाद 188 धावा केल्या. रत्नागिरीने नाशिकवर 12 धावांनी विजय मिळवला. रत्नागिरीकडून अजीम काझीने 4 ओव्हर्समध्ये 29 धावा देऊन 3 विकेट काढल्या.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.