AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arshin Kulkarni MPL 2023 : फक्त MPL नाही, 13 SIX मारणारा अर्शिन कुलकर्णी ‘या’ टुर्नामेंटमध्येही धमाकेदार खेळलाय, VIDEO

Arshin Kulkarni MPL 2023 : वयाच्या 18 व्या वर्षी महाराष्ट्राच्या युवा क्रिकेटने भविष्यातील स्टारची चुणूक दाखवलीय. अर्शिनच्या रुपाने भारतीय क्रिकेटला एक दमदार ऑलराऊंडर मिळू शकतो.

Arshin Kulkarni MPL 2023 : फक्त MPL नाही, 13 SIX मारणारा अर्शिन कुलकर्णी  'या' टुर्नामेंटमध्येही धमाकेदार खेळलाय, VIDEO
MPL 2023 Arshin Kulkarni eagle nashik titans player century against puneri bappa
| Updated on: Jun 21, 2023 | 10:58 AM
Share

पुणे : सध्या भारतीय क्रिकेटमध्ये एका नावाची चर्चा आहे, ते म्हणजे Arshin Kulkarni. चर्चा होणं स्वाभाविक आहे, कारण महाराष्ट्राच्या या युवा खेळाडूचा परफॉर्मन्सच तसा आहे. सध्या महाराष्ट्र प्रिमीअर लीग स्पर्धा सुरु आहे. IPL च्या धर्तीवर या टुर्नामेंटच आयोजन करण्यात आलं आहे. MPL 2023 मध्ये अर्शिन कुलकर्णी जबरदस्त प्रदर्शन करतोय. ईगल नाशिक टायटन्सकडून खेळणाऱ्या अर्शिनने आधी छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने 34 चेंडूत 60 धावा चोपल्या. यात 3 फोर, 5 सिक्स होते.

त्यानंतर पुणेरी बाप्पा विरुद्धच्या सामन्यात अर्शिन कुलकर्णीने 54 चेंडूत 117 धावा फटकावल्या. यात त्याने 3 फोर, 13 सिक्स होते.

पुण्याविरुद्ध ऑलराऊंडर खेळ

पुण्याविरुद्ध अर्शिनने तुफान बॅटिंग केली. त्याने चौफेर फटकेबाजी केली. पुण्याच्या गोलंदाजांचा त्याने चांगलाच समाचार घेतला. अर्शिनला रोखण कठीण दिसत होतं. फक्त बॅटनेच नाही, बॉलने सुद्धा अर्शिनने कमाल केली. पुण्याविरुद्धच अर्शिनने 4 ओव्हरमध्ये 21 धावा देऊन 4 विकेट काढले.

भविष्यातील स्टारची चुणूक

पुण्याविरुद्धच्या सामन्यात अर्शिनने लास्ट ओव्हर टाकली. T20 क्रिकेटमध्ये 5 धावा फार नाहीत, पण अर्शिनने या 5 धावांचा यशस्वी बचाव केला. हा एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. वयाच्या 18 व्या वर्षी महाराष्ट्राच्या युवा क्रिकेटने भविष्यातील स्टारची चुणूक दाखवलीय. अर्शिनच्या रुपाने भारतीय क्रिकेटला एक दमदार ऑलराऊंडर मिळू शकतो.

MPL च नाही ‘या’ टुर्नामेंटमध्येही चांगलं प्रदर्श

अर्शिन फक्त महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये चमक दाखवतोय असं नाहीय. त्याने महाराष्ट्राकडून खेळताना विनू मंकड ट्रॉफी 2022 मध्ये सर्वाधिक 268 धावा केल्या. यात दोन शतकं होती. कूचबिहार ट्रॉफीमध्ये सुद्धा अर्शिन सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज होता. महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये त्याने आतापर्यंत 3 मॅचमध्ये 195 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत 6.89 च्या इकॉनमीने 5 विकेट घेतल्या आहेत.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.