IPL 2022: MS Dhoni ची घोषणा, पुढच्यावर्षीही CSK साठी जीवाचं रान करणार, पण कॅप्टन कोण?

राजस्थान रॉयल्सच्या टीमममध्ये शिमरॉन हेटमायर परतला आहे. हेटमायरची पत्नी गर्भवती होती. म्हणून तो मायदेशी वेस्ट इंडिजला गेला होता.

IPL 2022: MS Dhoni ची घोषणा, पुढच्यावर्षीही CSK साठी जीवाचं रान करणार, पण कॅप्टन कोण?
csk Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 8:02 PM

मुंबई: IPL 2020 आणि 2021 सीजनच्या अखेरीस जो प्रश्न उपस्थित झाला होता. तोच प्रश्न 2022 मध्येही उपस्थित झाला. त्याचं उत्तरही लगेच मिळालं. महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) पुढच्या सीजनमध्येही खेळणार? असा प्रश्न विचारला होता. त्यावर धोनीने ‘हो’, असंच उत्तर दिलं. कॅप्टन कुलने पुन्हा एकदा चेन्नईच्या चाहत्यांना सेलिब्रेशनची संधी दिली आहे. पुढच्यावर्षी पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीमध्ये खेळणार असल्याचं धोनीने सांगितलं. चेन्नईच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर CSK च्या फॅन्ससमोर आपलं कौशल्य दाखवणार आहे. IPL 2022 ची लीग स्टेज शेवटच्या टप्प्यावर आहे. शेवटचे तीन सामने बाकी आहेत. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये  (RR vs CSK) सामना होत आहे. धोनीने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चेन्नईच्या टीममध्ये एकच बदल झालाय. अंबाती रायुडूने टीममध्ये कमबॅक केलं आहे. धोनी पुढच्यावर्षीही सीएसकेकडून खेळणार असला, तरी कॅप्टन कोण? हा प्रश्नच आहे. कारण या सीजनमध्ये रवींद्र जाडेजाला कॅप्टन बनवलं होतं. पण आठ सामन्यानंतर त्याने कॅप्टनशिप सोडली. पुन्हा धोनीकडे नेतृत्व सोपवलं.

राजस्थानचं सामना जिंकायलाच आज पहिलं प्राधान्य

राजस्थान रॉयल्सच्या टीमममध्ये शिमरॉन हेटमायर परतला आहे. हेटमायरची पत्नी गर्भवती होती. म्हणून तो मायदेशी वेस्ट इंडिजला गेला होता. राजस्थान रॉयल्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे 16 पॉइंट्स झालेत. प्लेऑफचं त्यांच तिकिट पक्क आहे. पण तरीही हा सामना ते सहजतेने घेणार नाहीत. कारण आज विजय मिळवल्यास ते दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकतात. म्हणजे त्यांची एलिमिनेटर राऊंडमधून सुटका होऊ शकते. त्यांना फायनलमध्ये जाण्यासाठी दोन संधी असतील.

सीजनचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न

धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नईचा संघ हा सामना जिंकून सीजनचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईने या सामन्यात टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.