IPL 2024 : बापरे ! आयपीएलमधील ‘या’ बहुचर्चित सामन्याच सर्वात स्वस्त तिकीट ‘फक्त’ 7,500 रुपये

IPL 2024 : भारतात क्रिकेट प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचाच प्रत्यय आयपीएल सामन्यांच्यावेळी येत आहे. आयपीएलमध्ये लवकरच एक सामना होणार आहे. त्या मॅचच्या सर्वात स्वस्त तिकीटाचा दर फक्त 7,500 रुपये आहे. हा सामना कधी आणि कुठल्या टीममध्ये होणार? ते जाणून घ्या.

IPL 2024 : बापरे ! आयपीएलमधील 'या' बहुचर्चित सामन्याच सर्वात स्वस्त तिकीट 'फक्त' 7,500 रुपये
IPL 2024 TROPHY
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 8:01 AM

सध्या देशात लोकसभा निवडणुकांबरोबर आयपीएलचा उत्सव सुरु आहे. क्रिकेटप्रेमी आयपीएलच्या सामन्यांचा आनंद लुटत आहेत. देशात वेगवेगळ्या स्टेडियममध्ये आयपीएलचे सामन्यांचा थरार सुरु आहे. भारतात क्रिकेट फक्त एक खेळ नाही, धर्मासमान आहे. भारतीय आपल्या आवडत्या क्रिकेटपटूवर मनापासून प्रेम करतात. काही चाहते हे आवडत्या क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळेच भारतात क्रिकेट सामन्यांच्यावेळी स्टेडियम खच्चून भरलेली असतात. स्टेडियममधील तिकीटाचे दर काही शे रुपयांपासून काही हजारांपर्यंत असतात. आता आयपीएलमधील एका सामन्याच सर्वात स्वस्त तिकीट 7500 रुपयांना आहे. त्यावरुनच भारतातील क्रिकेटची लोकप्रियता लक्षात येते.

सर्वात स्वस्त तिकीट 7500 रुपयांना हे वाचूनच तुम्हाला धक्का बसेल. पण हा एमएस धोनी इफेक्ट आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी त्याची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. आयपीएलमधील धोनीचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आजही काहीही करायला तयार असतात. चेन्नई सुपर किंग्स काही दिवसांनी पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार आहे. हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला येथे ही मॅच होणार आहे. थाला HPCA स्टेडियममध्ये खेळणार आहे. त्यामुळे इथे तिकीटाचे दर प्रचंड वाढले आहेत.

मुल्लानपूर स्टेडियममध्ये सर्वात स्वस्त तिकीट कितीला होतं?

IPL 2024 मध्ये HPCA स्टेडियम पंजाब किंग्सच दुसर घर आहे. मुल्लानपूरमध्ये पहिले पाच सामने खेळल्यानंतर पंजाब किंग्स धर्मशालामध्ये उर्वरित दोन सामने खेळणार आहे. 5 मे रोजी हा सामना होणार आहे. या सामन्यातील सर्वात स्वस्त तिकीटाचा दर 7500 रुपये आहे. मुल्लानपूर स्टेडियममध्ये PBKS च्या सामन्यासाठी सर्वात स्वस्त तिकीट 1200 रुपयाला होतं. महागड्या तिकीटाचा रेट 3000 हजार रुपये होता. म्हणजे PBKS vs CSK सामन्याच सर्वात तिकीट मुल्लानपूरपेक्षा अडीचपट जास्त आहे.

शेवटचा T20 सामना कधी खेळलेला?

HPCA स्टेडियममध्ये धोनी शेवटचा 2017 मध्ये खेळला होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्यावेळी धोनीने 65 धावा केल्या होत्या. इथेच शेवटचा T20 सामना 2015 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. त्याने 12 चेंडूत 20 धावा केल्या होत्या.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.