MS Dhoni ने मोलाची गोष्ट सांगताच सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट, पहा VIDEO

MS Dhoni काय बोलला? आणि क्रिकेटप्रमाणेच ते इतर क्षेत्रांनाही कसं लागू पडतं, त्यासाठी हा VIDEO पहा

MS Dhoni ने मोलाची गोष्ट सांगताच सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट, पहा VIDEO
MS Dhoni Image Credit source: VideoGrab
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 4:38 PM

नवी दिल्ली: क्रिकेट खेळणं आणि क्रिकेटची समज असणं, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एमएस धोनी दोन्हींमध्ये मास्टर आहे. त्यामुळेच आज क्रिकेटविश्वात धोनीच एक वेगळं स्थान आहे. क्रिकेट खेळताना रीड करणं म्हणजे परिस्थिती समजून घेणं महत्त्वाच असतं. धोनी त्यात माहीर आहे. धोनी क्रिकेट खेळताना सिच्युएशन ज्या पद्धतीने समजून घ्यायचा. कदाचितच दुसरा खेळाडू अशा पद्धतीने खेळाचा अंदाज बांधत असेल. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. पण धोनी अजूनही क्रिकेट आपलं आयुष्य असल्याचं म्हणतो. एका कार्यक्रमात धोनीने क्रिकेटबद्दल एक गोष्ट सांगितली, त्यानंतर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

धोनीने सुरुवात केली, तेव्हा असं नव्हतं….

सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. क्रिकेटच्या मैदानात कुठलीही महत्त्वाची गोष्ट घडली की, लगेच टि्वटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्याचं प्रतिबिंब उमटतं. आज छोट्या-मोठ्या क्रिकेटर्सचे फॉलोअर्स आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकण्याआधी त्यांची एक ओळख बनलेली असते. धोनीने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा सोशल मीडिया नव्हता.

धोनीने सांगितली मोलाची गोष्ट

धोनीच्या जमान्यात टि्वटर, इन्स्टाग्राम नव्हतं. पण धोनीला त्याबद्दल कुठलीही खंत नाहीय. फक्त सोशल मीडियामुळे नाही, तर तुम्ही चांगले क्रिकेट खेळलात, तर तुमचे फॉलोअर्स वाढतील, असं धोनीने सांगितलं. एका इव्हेंटमध्ये धोनीने ही गोष्ट ज्या पद्धतीने सांगितली, त्यानंतर सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हीच गोष्ट मी आजच्या क्रिकेटर्सना सांगतो

“क्रिकेट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 2004-05 मध्ये मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा आजच्यासारखं टि्वटर, इन्स्टाग्राम नव्हतं. आज लोकांना फॉलोअर्स आणि लाइक्सची चिंता असते. मी क्रिकेट खेळायचो, तेव्हा असं काही नव्हतं. मी क्रिकेटवर फोकस केलं. देशासाठी चांगलं प्रदर्शन केलं, तर फॉलोअर्स आपोआप वाढतील. हीच गोष्ट मी आजच्या क्रिकेटर्सना सांगतो” असं धोनी म्हणाला.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.