धोनीचा मनाचा मोठेपणा, आगामी विश्वचषकात मानधन न घेता मार्गदर्शन करणार, BCCI ची माहिती

| Updated on: Oct 12, 2021 | 7:29 PM

आगामी टी – 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा बीसीसीआयने (BCCI) याआधीच केली आहे. विशेष म्हणजे माजी कर्णधार धोनीही संघासोबत असणार आहे.

धोनीचा मनाचा मोठेपणा, आगामी विश्वचषकात मानधन न घेता मार्गदर्शन करणार, BCCI ची माहिती
विराट कोहली, एम एस धोनी आणि रवी शास्त्री
Follow us on

मुंबई : अनेक कठीण प्रसंगातून भारतीय संघाला विजयाची वाट दाखवणारा एमएस धोनी (MS Dhoni) आगामी टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघा संघाचा मेन्टॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून राहणार आहे. पहिला-वहिला टी20 विश्वचषक भारताला जिंकवून देणारा धोनी 2020 मध्ये आंतरराश्ष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. पण आजही भारतीय क्रिकेटप्रेमी त्याच्यासाठी वेडे आहेत. त्याने आणखी एक मनाचा मोठेपणा दाखवत पुन्हा एकदा साऱ्यांची मनं जिंकली आहेत. धोनी आगामी विश्वचषकावेळी संघाचा मेन्टॉर म्हणून काम पाहताला कोणतंच मानधन घेणार नसल्याचं समोर आलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्वत: ही माहिती दिली.

शाह यांनी एएनआयशी बोलताना धोनी विनापैसे टीम इंडियाचा मार्गदर्शक म्हणून संघासोबत राहणार आहे. ते म्हणाले, ‘एमएस धोनी टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची सेवा करताना कोणतचं मानधन घेणार नाही.’ आगामी विश्वचषकाला 17 ऑक्टोबरला सुरुवात होणार असून भारतीय संघ पाकिस्तान सोहबतच्या  24 ऑक्टोबरच्या सामन्याने आपल्या विश्वचषकाची सुरुवात करणार आहे.

MS धोनीचं टीम इंडियात कमबॅक

धोनीने आतापर्यंत आपल्या व्यूव्हरचनेने अनेक वेळा प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजलं. शक्य नसतानाही अनेक विजय शक्य करुन दाखवले… कधी आक्रमक धुव्वाधार खेळी करुन तर कधी स्टम्प्सच्या मागे राहून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अनाकलनीय बदल करुन…. आता टी ट्वेन्टी क्रिकेट संघात धोनी खुद्द मैदानावर नसेल पण मैदानाबाहेर राहून तो विराटसेनेला प्रतिस्पर्ध्याना चितपट करण्याचे धडे देणार आहे.

टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

इतर बातम्या

T20 World Cup खेळणाऱ्या भारतीय संघातील 15 पैकी 10 खेळाडू आयपीएल बाहेर, खेळाडूंचा फॉर्म पाहता BCCI चिंतेत

धोनीची फटकेबाजी पाहून छोट्या मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, मॅच संपल्यानंतर माहीकडून चिमुरडीला गोड गिफ्ट

The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश

(MS Dhoni will not take any fee for mentoring team india in T20 WorldCup)