AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup खेळणाऱ्या भारतीय संघातील 15 पैकी 10 खेळाडू आयपीएल बाहेर, खेळाडूंचा फॉर्म पाहता BCCI चिंतेत

आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील 60 पैकी 58 सामने संपले असून आता केवळ 2 सामने उरले आहेत. चेन्नई सुपरकिंग्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला असून दिल्ली आणि केकेआर यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे.

T20 World Cup खेळणाऱ्या भारतीय संघातील 15 पैकी 10 खेळाडू आयपीएल बाहेर, खेळाडूंचा फॉर्म पाहता BCCI चिंतेत
भारतीय क्रिकेट संघ
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 6:07 PM
Share

मुंबई : सध्या सुरु असलेली आयपीएल (IPL 2021) संपताच  टी-20 विश्वचषकाला(ICC T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचे केवळ 2 सामने शिल्लक आहेत. चेन्नई सुपरकिंग्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला असून दिल्ली आणि केकेआर यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे. पण या आतापर्यंतच्या सामन्यानंतर आता आगामी विश्वचषकात भारतीय संघातील 15 पैकी केवळ 5 खेळाडूच आयपीएलमध्ये आहेत. इतर 10 जणांचे संघ स्पर्धेच्या बाहेर गेले आहेत. त्यात यंदा 6 खेळाडूंची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती, तर 4 जणांची काहीशी दिलासादायक होती.

आगामी विश्वचषकासाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या टीम इंडियामध्ये (Team India) 15 सदस्यांचा समावेश आहे. पण यातीलच काही सदस्यांनी आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी केल्याने बीसीसीआयच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे संघ बदल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान भारत हा थेट सुपर-12 मध्ये उतरणाऱ्या संघामधील एक असल्याने 15 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करु शकतो.

विराटची सुमार कामगिरी

आयपीएल भारतीय कर्णधार विराटची कामगिरी ही सुमार राहिली. नुकताच प्लेऑफमध्ये केकेआरकडून पराभूत होऊन विराटचा आरसीबी संघ स्पर्धेबाहेर गेला. दरम्यान कोहलीने यंदाच्या पर्वात 15 सामन्यात 29 च्या सरासरीने 405 धावा केल्या. 3 अर्धशतकंही त्याने लगावली. मागील वर्षी मात्र त्याने 15 सामन्यातच 466 धावा केल्या होत्या. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा त्याची कामगिरी घसरलेली दिसून आली.

केएल राहुलची दमदार कामगिरी कायम

पंजाब किंग्स चा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) मात्र त्याची उत्तम कामगिरी यंदाही कायम ठेवली. त्याने केवळ 13 सामन्यात 63 च्या सरासराने 626 धावा केल्या.  6 अर्धशतकही त्याने लगावली. सध्या तो ऑरेंज कॅपच्या यादीतही एक नंबरला आहे.

हार्दीकसह इशानही फेल

भारतीय संघाचा स्टार अष्टैपूल खेळाडू हार्दिक पंड्याही यंगा खास कामगिरी करु शकला नाही. त्याने गोलंदाजीतर केलीच नाही आणि फलंदाजीतही 12 सामन्यातं 14 च्या सरासरीने 127 धावाचं करु शकला. मागील वर्षीही त्याने 14 सामन्यात केवळ 281 धावाचं केल्या होत्या. दुसरीकडे इशान किशने 10 सामन्यात 27 च्या सरासरीने 241 धावाचं केल्या.

गोलंदाजीत सुमार रिजल्ट

विश्वचषकात निवडलेल्या गोलंदाजांचा विचार करता. राहुल चाहर आणि भुवनेश्वर यांची कामगिरी चिंताजनक असली तरी बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी मात्र त्यांची लय कायम ठेवली आहे. राहुल चाहरने 11 सामन्यात केवळ 13 विकेट्स घेतले. तर भुवनेश्वर कुमारने 11 सामन्यात केवळ 6 विकेट्स घेतले. या दोघांनी कामगिरी चिंताजनक आहे. मात्र  दुसरीकडे बुमराहने 14 सामन्यांत 21 विकेट्स घेतले असून वरुणने 15 सामन्यात केवळ 16 विकेट्स घेतल्या.

इतर बातम्या

धोनीची फटकेबाजी पाहून छोट्या मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, मॅच संपल्यानंतर माहीकडून चिमुरडीला गोड गिफ्ट

The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश

DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!

(In Upcoming T20 Worldcups 10 players of team india from 15 Players are out of IPL 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.