IPL 2023 Final : पत्नीसोबत कोपऱ्यात बसून काय करत होता दीपक चाहर?, धोनीने पकडलं तर…; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

उद्या चेन्नई आणि गुजरातमध्ये अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

IPL 2023 Final : पत्नीसोबत कोपऱ्यात बसून काय करत होता दीपक चाहर?, धोनीने पकडलं तर...; 'तो' व्हिडीओ व्हायरल
IPL 2023 FinalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 1:28 PM

नवी दिल्ली : अहमदाबाद येथे होणाऱ्या आयपीएलच्या शेवटच्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ अहमदाबाद पोहोचला आहे. उद्या 28 मे रोजी हा अंतिम सामना होणार आहे. यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघ हा हार्दीक पांड्याच्या गुजरात टायटन्सशी कडवी झुंज देणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. पण चेन्नईची टीम किती प्रेशरमध्ये आहे? टीममधील वातावरण कसं आहे याचा अंदाड एका व्हिडीओतून येऊ शकतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. दीपक चाहर, त्याची पत्नी जया आणि कर्णधार एमएस धोनी या व्हिडीओत दिसत असून चेन्नईच्या संघाने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. यावरून चेन्नईचा संघ बिल्कूल टेन्शनमध्ये नसून टीममध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

धोनी, चाहर आणि जया हे तिघेही विमानात बसलेले आहेत. दीपक चाहर त्याची पत्नी जयासोबत कोपऱ्यात म्हणजे विंडो सीटवर बसले आहेत. दीपक पत्नीला मोबाईलमध्ये काही तरी दाखवताना दिसत आहे. दोघेही मोबाईलमध्ये गुंग असताना तितक्यात जयाची नजर धोनीकडे जाते. धोनी या दोघांच्या समोरच उभा असतो आणि या दोघांकडे पाहत असतो. धोनी आपल्यासमोर उभा असल्याचं एव्हाना दीपकला कळतं. तोही तिरक्या नजरेने धोनीकडे पाहतो. त्यानंतर दीपकने जे केलं त्यामुळे धोनीच्या चेहऱ्यावर स्माईल दिसते.

फॅन्स फिदा

धोनीशी नजरानजर होताच दीपक धोनीकडे पाहतो. मोबाईल समोर धरतो आणि धोनीला हॅलो म्हणत धोनीचाच व्हिडीओ काढू लागतो. दीपकचा हा हजर जबाबीपणा पाहून धोनीही त्याच्याकडे एकटक पाहून गालातल्या गालात हसतो आणि पुढे जातो. हा व्हिडीओ शेअर झाल्यावर चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. धोनीची स्माईल पाहून त्यावर फॅन्सही फिदा झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मुंबईला हरवलं

चेन्नईचा संघ तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानंतर क्वालिफायरमध्ये चेन्नई नंबर एकवर गेली. धोनीच्या टीमने गुजरात टायटन्सचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. गुजरातचा संघही पाइंट टेबलमध्ये टॉपला होता. क्वालिफायर एकमध्ये पराभव झाल्यानंतर गुजरातला आणखी एक संधी मिळाली. क्वालिफायर टूमध्ये एलिमिनेटरमधील विजेता संघ मुंबईशी गुजरातची काल भिडत झाली. यावेळी गुजरातने अप्रितम खेळाचं प्रदर्शन घडवत मुंबईचा पराभव केला. त्यामुळे गुजरातचं फायनलमधील तिकीट कन्फर्म झालं. आता उद्या चेन्नई आणि गुजरातमध्ये अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.