AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MCA Election: आशिष शेलारांचा अर्ज दाखल, शरद पवार गटाविरुद्ध सामना

मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत शरद पवार विरुद्ध आशिष शेलार सामना

MCA Election: आशिष शेलारांचा अर्ज दाखल, शरद पवार गटाविरुद्ध सामना
asish shelar
| Updated on: Oct 10, 2022 | 12:55 PM
Share

दिनेश दुखंडे, TV9 मराठी मुंबई:  यंदा मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक (MCA Election) रंगतदार होणार आहे. आशिष शेलारांनी (Asish Shelar) मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्या गटाकडून संदीप पाटील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे यंदा माजी क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी असा सामना रंगणार आहे.

शेलार याआधी सुद्धा एमसीएचे अध्यक्ष होते

तब्बल 11 वर्षानंतर मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी अशी लढत होणार आहे. आशिष शेलार यांनी याआधी सुद्धा एमसीएच अध्यक्षपद भूषवलं आहे. आशिष शेलार सध्या मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत.

एमसीए निवडणुकीत एक दुर्मिळ योग

दरम्यान मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत एक दुर्मिळ योग पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या क्लबकडून मतदानाचा हक्क बजावतील. मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी मतदारांची यादी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली आहे.

यावेळी शरद पवार आशिष शेलारांच्या क्लबकडून मतदानाचा हक्क बजावतील. पारसी पायोनियर क्लबची मालकी आशिष शेलारांकडे आहे. पारसी पायोनियर क्लबची मालकी रमांकात आचरेकर सरांच्या कुटुंबियांकडे होती.

आचरेकर कुटुंबियांकडून विकत घेतला क्लब

दोन आठवड्यांपूर्वी आशिष शेलारांनी हा क्लब आचरेकर कुटुंबियांकडून विकत घेतला. येत्या 20 ऑक्टोबरला मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.