IPL 2026 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याची मुंबई इंडियन्सला अजूनही संधी, इतकं केलं की झालं…
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सात सामन्यांचा खेळ संपला आहे. या सात पैकी 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे प्लेऑफचा मार्ग किचकट झाला आहे. मात्र बंद झाला असं नाही. मुंबई इंडियन्सला काय करावं लागणार ते जाणून घेऊयात..

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाची स्थिती नाजूक आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने सात सामने खेळले आणि त्यापैकी पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे प्लेऑफचं मार्ग किचकट झाला आहे. असं असलं तरी बंद झालेला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना अजूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मागच्या पर्वात मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती. यंदाही तशाच चमत्काराची अपेक्षा बाळगून आहेत. मागच्या पर्वात मुंबई इंडियन्सने 14 सामने खेळले आणि त्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला आणि 6 सामने गमावले होते. मुंबई इंडियन्सच्या खात्यात 16 गुण होते आणि चौथ्या स्थानावर झेप घेतली होती. यंदाही मुंबई इंडियन्स तशीच कामगिरी करेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी बाळगून आहेत. चला जाणून घेऊयात मुंबई इंडियन्सला किती संधी आहे ते…
आयपीएल स्पर्धेत प्रत्येक संघाल एकूण 14 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 7 सामने मुंबई इंडियन्सने खेळले असून अजून 7 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी 2 सामन्यात विजय मिळवला असून आठव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सच्या पदरात 4 गुण असून नेट रनरेट हा -0.736 इतका आहे. आता प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर मुंबई इंडियन्सला 16 गुण मिळवणं आवश्यक आहे. कारण 16 गुण हे प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सुरक्षित मानले जातात. त्यामुळे मुंबई इंडियन्सला उर्वरित सात सामन्यापैकी सहा सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. कारण सहा सामन्यात विजय मिळवला तर 12 गुण मिळतील आणि 16 गुणांचं गणित सुटेल.
मुंबई इंडियन्सला त्यामुळे प्रत्येक सामना हा करो या मरोची स्थिती असणार आहे. मुंबई इंडियन्सने सात पैकी 5 सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफचं गणित जर तर वर येऊ शकतं. कारण 14 गुण असले की गणित नेट रनरेटच्या आधारावर सुटू शकतं. पण मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट काही चांगला नाही. त्यामुळे 16 गुण मिळवणं हेच चांगलं राहिलं. म्हणजेच मुंबई इंडियन्सला आणखी एका पराभवाची सूट आहे. पण सात पैकी सहा सामने जिंकणं भाग आहे.
मुंबई इंडियन्सचे पुढचे सामने
- मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 29 एप्रिल 2026
- मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 2 मे 2026
- मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स, 4 मे 2026
- मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 10 मे 2026
- मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, 14 मे 2026
- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 20 मे 2026
- मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 24 मे 2026