Ashes Series: ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे क्रिकेटपटू दारु पार्टीत दंग असताना अचानक पोलीस तिथे पोहोचले आणि… VIDEO

Ashes Series: ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे क्रिकेटपटू दारु पार्टीत दंग असताना अचानक पोलीस तिथे पोहोचले आणि... VIDEO

होबार्ट येथे झालेली पाचवी आणि शेवटची कसोटी ऑस्ट्रेलियान 146 धावांनी जिंकली. त्यानंतर ही पार्टी सुरु होती.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 18, 2022 | 3:07 PM

होबार्ट: अ‍ॅशेस मालिका (Ashes Series) संपल्यानंतर होबार्टमध्ये ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटुंची सुरु असलेली दारु पार्टी पोलिसांनी उधळून लावली. या पार्टीमध्ये ऑस्ट्रेलियाचे तीन तर इंग्लंडचा कर्णधार जो रुट (Joe Root) आणि पेस बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) होता. होबार्टमध्ये हॉटेलच्या गच्चीवर ही दारु पार्टी सुरु होती. इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियान खेळाडू या पार्टीमध्ये दंग झाले होते. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन, ट्रॅव्हिस हेड, अ‍ॅलेक्स कारे आणि इंग्लंडकडून जो रुट, अँडरसन या पार्टीमध्ये होते.

लायन आणि कारे हे ऑस्ट्रेलियन खेळाडू पोषाखामध्येच होते

पार्टी सुरु असतानाच अचानक पोलीस तिथे येऊन पोहोचले. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने या पार्टीवर कारवाई करतानाचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओत लायन आणि कारे हे ऑस्ट्रेलियन खेळाडू पोषाखामध्येच दिसत आहेत.

विजय साजरा करण्यासाठी संपूर्ण रात्र होती

होबार्ट येथे झालेली पाचवी आणि शेवटची कसोटी ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी जिंकली. त्यानंतर ही पार्टी सुरु होती. तिथे जे घड्याळ होतं, त्यात संध्याकाळचे 6.30 वाजले होते. ऑस्ट्रेलियाकडे अ‍ॅशेसचा विजय साजरा करण्यासाठी संपूर्ण रात्र होती. या खेळाडुंची पार्टी सुरु असताना मोठ्या प्रमाणात आवाज येत होता. त्यामुळे हॉटेल स्टाफनेच पोलिसांकडे मदत मागितल्याचे वृत्त आहे.

काल कमिन्सच कौतुक झालं होतं 

पोलीस पोहोचल्यानंतर क्रिकेटपटुंनी पार्टी बंद केली व तिथून काढता पाय घेतला. कालच ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सच्या कृतीच सोशल मीडियावर कौतुक सुरु होतं. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटुंच्या अशा वर्तनाचा व्हिडिओ समोर आलाय. कमिन्सने संघातील मुस्लिम खेळाडू उस्मान ख्वाजाला सेलिब्रेशनमध्ये सहभागी होता यावं, यासाठी खेळाडूंना शॅम्पेन फोडण्यापासून रोखलं होतं.

(Nathan Lyon Joe Root James Anderson kicked out after police crash post Ashes booze party)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें