AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Odi Cricket : रोहित-विराटनंतर आणखी एका खेळाडूचं 7 महिन्यानंतर टीममध्ये कमबॅक, कोण आहे तो?

Odi Cricket : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनंतर आणखी एक अनुभवी खेळाडू 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोण आहे तो?

Odi Cricket : रोहित-विराटनंतर आणखी एका खेळाडूचं 7 महिन्यानंतर टीममध्ये कमबॅक, कोण आहे तो?
Rohit and Virat Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Oct 20, 2025 | 5:07 PM
Share

रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीचं एकदिवसीय संघात 7 महिन्यांनंतर कमबॅक झालं. या दोघांनीही चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलनंतर पहिला एकदिवसीय सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला. मात्र दोघांनाही कमबॅकनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आलं. विराट आणि रोहित या दोघांनंतर आता आणखी एका खेळाडूचं एकदिवसीय संघात 7 महिन्यांनी पुनरागमन झालं आहे. या खेळाडूनेही त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा सामना हा 9 मार्च चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनिमित्ताने खेळला होता.

इंग्लंड क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात सध्या 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. त्यानंतर 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी 14 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मिचेल सँटनर न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

केन विलियमसनचं 7 महिन्यांनी कमबॅक

अनुभवी फलंदाज आणि केन विलियमसन याला एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच ऑलराउंडर नॅथन स्मिथ याचंही कमबॅक झालं आहे. नॅथन वैद्यकीय कारणांमुळे टीममधून बाहेर होता. तर केन चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर टीममधून बाहेर होता. तसेच स्मिथ ऑगस्टनंतर टीममध्ये परतला आहे. स्मिथला ऑगस्ट महिन्यात झिंबाब्वे विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पोटाला दुखापत झाली होती.

6 खेळाडू दुखापतीमुळे आऊट

दरम्यान न्यूझीलंड क्रिकेट टीममधील  तब्बल 6 खेळाडूंना दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. न्यूझीलंडचे 1, 2 नाही तब्बल 6 खेळाडू दुखापतीच्या जाळ्यात अडकले आहेत. या 6 खेळाडूंमध्ये फिन एलन, लॉकी फर्ग्यूसन, विल ओरुर्के, ग्लेन फिलिप्स, बेन सीयर्स आणि एडम मिल्ने याचा समावेश आहे.

न्यूझीलंड-इंग्लंड एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, रविवार, 26 ऑक्टोबर, माउंट मौंगानुई

दुसरा सामना, बुधवार, 29 ऑक्टोबर, हॅमिल्टन

तिसरा सामना, शनिवार, 1 नोव्हेंबर, वेलिंग्टन

न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ

इंग्लंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कॅप्टन), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, कायल जेमीसन, टॉम लॅथम (विकेटकीपर), डॅरेल मिचेल, रचीन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विलियमसन आणि विल यंग.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या