Champions Trophy च्या 1 दिवसआधी आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, टीमला धक्का

Icc Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतून बाहेर होण्याचं सत्र सुरुच आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही तासा शिल्लक असताना आता आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

Champions Trophy च्या 1 दिवसआधी आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, टीमला धक्का
ind vs nz
Image Credit source: Bcci
| Updated on: Feb 18, 2025 | 3:36 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला आता 24 तासांपेक्षा कमी वेळ बाकी आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना हा यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे आणखी एका खेळाडूला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे टीमला मोठा झटका लागला आहे. टीम मॅनेजमेंटकडून याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे. तसेच बदली खेळाडू म्हणून कुणाला संधी दिलीय? याबाबतही जाहीर करण्यात आलंय.

लॉकी फर्ग्यूसन आऊट

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसन दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. न्यूझीलंड क्रिकेटकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. लॉकीने अखेरचा एकदिवसीय सामना हा 2023 साली खेळला होता. आता लॉकी बाहेर झाल्याने त्याच्या जागी संघात ऑलराउंडर कायले जेमीन्सन याचा समावेश करण्यात आला आहे. लॉकीने 23 सप्टेंबर 2023 रोजी अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून लॉकी दुखापतीमुळे टीममधून बाहेर होता.

कायले जेमीन्सन याला संधी

लॉकी फर्ग्यूसन बाहेर झाल्याने आम्ही फार दु:खी आहोत. लॉकी प्रमुख गोलंदाजांपैकी एक होता, असं न्यूझीलंडचे हेड कोच गेरी स्टेड यांनी म्हटलं. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये जेमीन्सन चांगली कामगिरी करत असल्याने स्टेड आनंदी आहेत. जेमीन्सनला पाकिस्तामध्ये खेळपट्टीकडून मदत मिळू शकते, जे प्रतिस्पर्धी संघासाठी आव्हानात्मक ठरु शकतं. तसेच जेमीन्सन बॅटिंगही करु शकतो.

जेमीन्सनची एकदिवसीय कारकीर्द

जेमीन्सनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जेमीन्सनने 12 डावांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 20.75 च्या सरासरीने 83 धावा केल्या आहेत. जेमीन्सन अखेरच्या क्षणी विस्फोटक बॅटिंग करुन न्यूझीलंडला फिनीशिंग टच देऊ शकतो.

एक गेला आणि एक आला

बेन सीयर्स आऊट

तसेच लॉकीआधी वेगवान गोलंदाज बेन सीयर्स यालाही दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर व्हावं लागलं. बेन याला हॅमस्ट्रिंगमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. बेनच्या जागी जेकब डफी याचा समावेश करण्यात आला आहे.