IPL 2021 : सर्वात महागड्या खेळाडूच्या जागी केकेआरमध्ये ‘हा’ दिग्गज खेळणार, T20 क्रिकेटमध्ये 224 विकेट्स पटकावणारा महारथी

IPL 2021 च्या आतापर्यंतच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघा खास कामगिरी करु शकलेला नाही. त्यात महत्त्वाचा गोलंदाज पॅट कमिन्स स्पर्धेबाहेर गेल्याने संघाच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. पण या अडचणींवर मात करण्यासाठी संघात एका नवी खेळाडूची एन्ट्री देखील झाली आहे.

IPL 2021 : सर्वात महागड्या खेळाडूच्या जागी केकेआरमध्ये 'हा' दिग्गज खेळणार, T20 क्रिकेटमध्ये 224 विकेट्स पटकावणारा महारथी
केकेआर

मुंबई : दोन वेळा आयपीएल विजेता संघ कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यंदाच्या आयपीएलमध्ये ( IPL 2021) एका नव्या खेळाडूसह मैदानात उतरणार आहे. यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या पर्वात संघातील सर्वात महाग खेळाडू पॅट कमिन्सला (Pat Cummins) घेऊन खेळणारा केकेआर उर्वरीत पर्वात मात्र दुसऱ्या खेळाडूला घेऊन खेळणार आहे. खाजगी कारणांमुळे स्पर्धेबाहेर गेलेल्या पॅटच्या जागी जगातील एक उत्कृष्ट गोलंदाज केकेआरमध्ये सामिल होणार आहे. हा खेळाडू म्हणजे न्यूझीलंडचा टीम साऊदी (Tim Southee).

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज पॅटने आयपीएल 2021 च्या उर्वरीत सामन्यांमध्ये खेळण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून टीमला केकेआरमध्ये घेण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलचं दुसरं पर्व सुरु होणार आहे. या पर्वात उर्वरीत 31 सामने खेळवले जातील. दरम्यान राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरूसारख्या दिग्गज संघात खेळलेला टीम आता केकेआरमधून काय कमाल करतो? हे पाहावं लागेल.

आयपीएलमध्ये कोरोनाचा उद्रेक

मे महिन्याच्या सुरुवातीला आयपीएलमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने 3 मे रोजीचा RCB विरुद्ध KKR हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर 4 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे IPL ची स्पर्धा  स्थगित करण्याचा निर्णय BCCI ने 4 मे रोजी घेतला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी उर्वरीत आयपीएल युएईत घेणार असल्याची माहिती दिली होती. ज्यानंतर आणखी काही दिवसांनी आयपीएलची तारीख आणि वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं.

उर्वरीत आयपीएल 2021 चे संपूर्ण वेळापत्रक

19 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
20 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
21 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
22 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
23 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
24 सप्टेंबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह
25 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
25 सप्टेंबर – सनयारझर्स हैदराबाद VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह
26 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्स VS कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
26 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
27 सप्टेंबर- सनरायझर्स हैदराबाद VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
28 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
28 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
29 सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
30 सप्टेंबर – सनरायझर्स हैदराबाद VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
1 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
2 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
2 ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
3 ऑक्टोबर – पंजाब किंग्स VS रॉयल चँलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
3 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
4 ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
5 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
6 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
7 ऑक्टोबर – चेन्नई सुपर किंग्स VS पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – दुबई
7 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
8 ऑक्टोबर – सनरायझर्स हैदराबाद VS मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
8 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
10 ऑक्टोबर – क्वालिफायर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
11 ऑक्टोबर – एलिमिनेटर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
13 ऑक्टोबर – क्वालिफायर 2, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
15 ऑक्टोबर- अंतिम सामना, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई

हे ही वाचा –

IPL 2021: जगातील नंबर 1 टी-20 बोलर राजस्थान रॉयल्समध्ये, ‘या’ खेळाडूच्या जागी खेळणार

VIDEO : इंग्लंडच्या T20 Blast मध्ये दिसली धोनीची झलक, ‘या’ खेळाडूने उडवला ‘सेम टू सेम’ हेलिकॉप्टर शॉट

IPL 2021 पूर्वीच धोनीने उडवले उंच षटकार, मग स्वत:च गेला झाडात चेंडू शोधायला, पाहा मजेशीर VIDEO

(New zealand star tim southee joins kolkata knight riders replace pat cummins in ipl 2021)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI