IND vs SA: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वीच भारताचा स्टार खेळाडू आऊट, कारण की…
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून होत आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यापूर्वी संघात निवड झालेल्या खेळाडूला रिलीज केलं आहे. नेमकं काय झालं आणि कशासाठी ते जाणून घ्या.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 14 नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे टीम इंडियाला जराही जोखिम पत्कारण्यास तयार नाही. मागच्या पर्वात थोडक्यासाठी टीम इंडियाचं अंतिम फेरीत खेळण्याचं स्वप्न भंगलं होतं. असं असताना टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये अचानक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. टीममधील युवा खेळाडूला रिलीज केलं आहे. भारतीय संघाच्या दुसऱ्या दिवसाच्या सराव शिबिरापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सहाय्यक प्रशिक्षक टेनडेशकाटे यांनी ही माहिती दिली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला संघातून रिलीज केलं आहे. त्यामुळे ध्रुव जुरेलचं प्लेइंग 11 मधील स्थान जवळपास पक्कं झालं आहे.
नितीश कुमार रेड्डी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा भाग होता. मात्र वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पायाला क्वाड्राइसेप्स मसलला दुखापता झाली होती. त्यानंतर मानेला झालेल्या दुखापतीमुळे टी0 मालिकेत सुरुवातीच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. आता पूर्ण फिट होत संघात परतला होता. मात्र त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सहाय्यक प्रशिक्षक टेनडेशकाटे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केली की, नितीश कुमार रेड्डीला पहिल्या सामन्यात बाहेर बसवावं लागू शकते. त्यामुळे त्याला राजकोटमध्ये होणाऱ्या दक्षिण अफ्रिका ए संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी रिलीज केलं आहे. आता तो इंडिया ए संघाकडून मालिका खेळेल.
नितीश कुमार रेड्डी नुकताच दुखापतीतून सावरत परतला होता. कसोटी मालिकेत खेळण्यासाठी सराव शिबिरात घाम गाळत होता. पण प्लेइंग 11 मध्ये जागा मिळत नसल्याचं पाहून त्याला रिलीज केलं आहे. भारत अ संघासोबत आता तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. ही वनडे मालिका 13 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. तिन्ही सामने राजकोटमध्ये खेळले जाणार आहेत. या मालिकेत टीम इंडियाची धुरा तिलक वर्माच्या खांद्यावर आहे. तर ऋतुराज गायकवाड उपकर्णधार आहे.
