Mumbai Indians | मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला लॉटरी, अचानक टीममध्ये निवड
Cricket | मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 16 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या स्टार फलंदाजाला लॉटरी लागलीय. या खेळाडूची टीममध्ये निवड झालीय.

मुंबई | आयपीएलमुळे अनेक युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण झालंय. या आयपीएलच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना टीम इंडियात खेळण्याची संधीही मिळाली आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि यासारख्या अनेक खेळाडूंचा उल्लेख करता येईल. अशाच एका मुंबई इंडियन्समधील खेळाडूला लॉटरी लागली आहे. या खेळाडूची टीममध्ये निवड झालीय. तो खेळाडू नक्की कोण आहे, हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या नेहल वढेरा याची टीममध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता वढेरा दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. नेहल दुलीप ट्रॉफीत नॉर्थ झोन टीमकडून खेळताना दिसणार आहे. वढेरा याने मुंबई इंडियन्ससाठी 16 व्या हंगामात अनेकदा निर्णायक खेळी केली आहे.
नेहलची नॉर्थ झोन टीममध्ये कॅप्टन मनदीप सिंह याच्या जागी निवड करण्यात आली आहे. मनदीपला स्पर्धेच्या काही दिवसांआधी दुखापत झाली. ही दुखापत नेहलच्या पथ्यावर पडली. तर दुसऱ्या बाजूला जयंत यादव याच्याकडे कर्णधारपदाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत.
दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धेला 28 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 12-16 जुलै दरम्यान फायनल मॅच होणार आहे. पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण 6 टीम सहभागी होणार आहेत. नॉर्थ झोन, वेस्ट झोन, साऊथ झोन, सेंट्रल झोन, इस्ट झोन आणि नॉर्थ इस्टर झोन अशी या 6 संघांची नावं आहेत.
नेहाल वढेरा याची क्रिकेट कारकीर्द
नेहल वढेरा हा युवराज सिंह याला आपला क्रिकेटमधील आदर्श मानतो. त्यामुळे नेहलला युवराज सिंह असंही म्हणतात. नेहलने आयपीएल 16 व्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 26.78 च्या सरासरीने 241 धावा केल्या. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेहलने पंजाबकडून खेळताना 5 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 376 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता नेहल दुलीप ट्रॉफीत कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दुलीप ट्रॉफीसाठी नॉर्थ झोन टीम | जयंत यादव (कर्णधार), प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), प्रशांत चोपडा, ध्रुव शौरे, मनन वोहरा, अंकित कुमार, एएस कलसी, हर्षित राणा, नेहाल वढेरा, पुलकित नारंग, निशांत संधू, वैभव अरोरा, सिद्धार्थ कौल, आबिद मुश्ताक आणि बलतेज सिंह.
