AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs BAN Live Streaming : न्यूझीलंडसमोर बांगलादेशचं आव्हान, किवी सलग तिसरा पराभव टाळणार का?

New Zealand vs Bangladesh Womens World Cup 2025 Live Match Score : न्यूझीलंडसमोर बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे.

NZ vs BAN Live Streaming : न्यूझीलंडसमोर बांगलादेशचं आव्हान, किवी सलग तिसरा पराभव टाळणार का?
New Zealand Women vs Bangladesh Women PreviewImage Credit source: @BCBtigers X Account
| Updated on: Oct 10, 2025 | 12:30 AM
Share

आयसीसी वनडे वूम्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अकराव्या सामन्यात शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील तिसरा सामना असणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत मोहिमेची सुरुवात विजयाने केली होती. मात्र त्यानंतर बांगलादेशला इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे बांगलादेशचा न्यूझीलंड विरुद्ध विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे.

तर दुसर्‍या बाजूला न्यूझीलंडसाठी करो या मरो अशी स्थिती आहे. न्यूझीलंडला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने 1 ऑक्टोबरला न्यूझीलंडला 89 धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने किवीचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला होता. त्यामुळे आता न्यूझीलंडला या मोहिमेतील आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर कोणत्याही स्थितीत शुक्रवारी सामना जिंकावाच लागणार आहे.

सोफी डीव्हाईन ही न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. निगर सुल्ताना हीच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. उभयसंघातील हा सामना कधी आणि कुठे पाहायला मिळणार? हे आपण जाणून घेऊयात.

न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना केव्हा?

न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना शुक्रवारी 10 ऑक्टोबरला होणार आहे.

न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना कुठे?

न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स मॅच मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार, बांगलादेश 2 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर न्यूझीलंड सातव्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानी गतविजेता ऑस्ट्रेलिया विराजमान आहे. तर 4 गुणांसह इंग्लंड, इंडिया आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी विराजमान आहेत.

नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.