NZvsSL 3rd T20I | न्यूझीलंडचा श्रीलंकेवर थरारक सामन्यात 4 विकेट्सने विजय, मालिका जिंकली

| Updated on: Apr 08, 2023 | 12:34 PM

न्यूझीलंडने श्रीलंकेचा तिसऱ्या टी 20 सामन्यात 4 विकेट्सने धुव्वा उडवत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने या विजयासह कसोटी, वनडे आणि त्यानंतर टी 20 मालिकाही जिंकली आहे.

NZvsSL 3rd T20I | न्यूझीलंडचा श्रीलंकेवर थरारक सामन्यात 4 विकेट्सने विजय, मालिका जिंकली
Follow us on

वेलिंग्टन | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात तिसरा आणि शेवटचा टी 20 क्रिकेट सामना खेळवण्यात आला. न्यूझीलंडने या तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये श्रीलंकेलवर थरारक विजय मिळवला. श्रीलंकेने न्यूझीलंडला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान 1 चेंडूआधी पूर्ण करत सामना जिंकला. न्यूझीलंडने 6 विकेट्स गमावून 19.5 ओव्हरमध्ये 183 धावा केल्या. न्यूझीलंडने या सामन्यासह 2-1 अशा फरकाने मालिकाही जिंकली. टीम सायफर्ट हा न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

न्यूझीलंडकडून टीम सायफर्ट याने 48 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 10 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 88 धावांची खेळी केली. कॅप्टन टॉम लॅथमने 31 धावा केल्या. चाड बोवेस याने 18, मार्क चॅपमॅनने 16 आणि डेरेल मिचेल याने 15 रन्सचं योगदान दिलं. तर जेम्शन निशाम याला भोपळाही फोडता आला नाही. रचिन रविंद्र याने नाबाद 2 धावा केल्या. तर एडम मिल्ने हा शून्यावर नाबाद परतला. श्रीलंकेकडून लहिरु कुमारा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर महिश तिक्षणा आणि प्रमोद मदुशन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

न्यूझीलंडने मालिका जिंकली

श्रीलंकेची बॅटिंग

त्याआधी न्यूझीलंडने टस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेने पहिल्या 5 फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 182 धावा केल्या. श्रीलंकेकडून कुसल मेंडिस याने 73 रन्सची अर्धशतकी खेळी केली. यात त्याने 48 बॉलमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 73 धावा केल्या. कुसल परेराने 73 धावांची खेळी केली. पाथुम निशंकाने 25 रन्स केल्या. धनंजया डी सिल्वाने 20 धावांचं योगदान दिलं. तर असलंका 3 रन्सवर धावबाद झाला. वानिंदु हसरंगा आणि एम तिक्षणा शू्न्यावर नाबाद परतले. न्यूझीलंडकडून बेन लिस्टर याने 2 फलंदाजाना आऊट केलं. तर एडम मिल्ने आणि इश सोढी या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकीपर), चाड बोवेस, टीम सेफर्ट, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, रचिन रवींद्र, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, ईश सोधी आणि बेन लिस्टर.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन | दासुन शनाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, प्रमोद मदुशन, कसून रजिथा आणि लाहिरू कुमारा.