नाव बदलून मैदानात उतरला, 150 धावा ठोकल्या, मीडियाशी चर्चेनंतर धक्कादायक खुलासा

एखादा खेळाडू स्वत:च नाव बदलून भलत्याच नावाने मैदानात खेळण्यासाठी उतरतो. अशी आगळी-वेगळी घटना तुम्ही कधी ऐकली देखील नसेल, पण हो अशी घटना घडली होती.

नाव बदलून मैदानात उतरला, 150 धावा ठोकल्या, मीडियाशी चर्चेनंतर धक्कादायक खुलासा
test batsman

लंडन : क्रिकेटच्या इतिहासातील एका विचित्र घटनेबाबत आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. म्हणजे विचार करा भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू उदाहरणार्थ रवींद्र जाडेजा मैदानात उतरताना वेगळ्याच नावाने उतरतो सर्वांना वाटतं कोणीतरी नवखा खेळाडू आहे आणि नंतर धमाकेदार खेळी केल्यावर कळतं हा तर आपला जाडेजा. अशी घटना विचार करायलाही किती विचित्र आहे, पण हो असं घडलं होतं आजच्याच दिवशी पण बऱ्याच वर्षांपूर्वी…

ही घटना घडला तो दिवस होता 9 जून, 1919. ठिकाण इंग्लंडमधील (England) प्रसिद्ध मैदान टांटन आणि सामना होता समरसेट आणि ग्‍लूसेस्‍टरशायर या संघामध्ये. समरसेट (Somerset) संघाकडून एस. ट्रिमनेल (S. Trimnell) नावाचा एक खेळाडू फलंदाजीसाठी उतरला. त्याआधी कोणी त्याच्याबद्दल ऐकलं नव्हतं. मात्र खेळायला सुरुवात करताच त्याने पहिल्या डावात 92 आणि दुसऱ्या डावात 58 धावा ठोकल्या. इतकी अप्रतिम खेळी केल्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा होऊ लागली. नंतर मीडियासोबतच्या चर्चेत हा खेळाडू समरसेट संघाचाच दिग्गज खेळाडू सिडनी रिप्पन (Sydney Rippon) असल्याचं समोर आलं.

ऑफिसमधून सुट्टीसाठी केली बहाना

तर हा सिडनी रिप्पन म्हणजे समरसेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू होता. सिडनीचा भाऊ डुडली रिप्‍पन हे दोघेही समरसेटसाठी खेळायचे. सोबतच ते सिडनी इनलँड रिवेन्‍यू कंपनीमध्ये काम करत होते. त्या दोघांनाही सुट्टीसाठी त्यांचा मालक जास्त त्रास देत नसला तरी नोकरीतील काही बंधनाचा विचार करत ऑफीसमध्ये प्रकृती ठिक नसल्याचे सांगत सुट्टी घेतली आणि मॅच खेळण्यासाठी टांटनला रवाना झाला. विशेष म्हणजे सिडनी यांनी एस ट्रिमनेल हे नाव त्यांच्या आजीच्या नावावरुन ठेवलं होतं.

अस समोर आलं सत्य

सिडनी यांची नाव बदलून खेळण्याची युक्ती सफलही झाली असती. पण त्यांनी दोन्ही डावांत धडाकेबाज खेळी करत सामन्यांत 150 धावा कुटल्या. ज्यामुळे सर्व मीडियाने नवख्या खेळाडूत रस घेतला. ज्यानंतर वेस्‍टर्न डेली या वृत्तपत्राने एस. ट्रिमनेलचा चेहरा सिडनी रिप्‍पनशी मिळता-जुळता असल्याचे स्पष्ट केले आणि सर्व सत्य समोर आले. सुदैवाने सिडनी यांच्या मालकाने ही गोष्ट सकारात्मक दृष्ट्या घेतली ज्यामुळे त्यांची नोकरी आणि क्रिकेट करीयर दोन्हीवर काहीच संकट आलं नाही. सिडनी रिप्‍पन यांनी 104 प्रथम श्रेणी सामन्यांत 21.59 च्या सरासरीने 3 हजार 823 धावा केल्या होत्या. ज्यात 6 शतकांसह 15 अर्धशतकांचा समावेश आहे.

हे ही वाचा –

क्रिकेटच्या मैदानातील सर्वात मोठा इतिहास न्यूझीलंडच्या नावावर, वन डे मध्ये 491 धावा, 347 धावांचा ‘भयंकर’ विजय

WTC फायनल सामन्यात सर्वाधिक रन्स कोण करणार? अजित आगरकरने सांगितलं नाव!

या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!

(On this Day England Cricketer Sydney Rippon Changed Name to S Trimnell for Somerset vs Gloucestershire)