तिघा बोलर्सनी मिळून टाकली एक ओव्हर, क्रिकेट इतिहासातील ही घटना तुम्हाला माहित आहे का?

क्रिकेटमध्ये एक ओव्हरमध्ये 6 बॉल असतात, जे शक्यतो एकच बोलर टाकतो. मात्र वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघातील एका सामन्यात एक ओव्हर तिघा बोलर्सनी टाकली होती.

तिघा बोलर्सनी मिळून टाकली एक ओव्हर, क्रिकेट इतिहासातील ही घटना तुम्हाला माहित आहे का?
bowler

मुंबई : क्रिकेट हा शेकडो वर्षें जुना खेळ आहे. सुरुवातीला क्रिकेटमध्ये एक ओव्हरमध्ये 6 नाही तर 8 बॉल्स असायचे, असो त्याबाबत आज आपण चर्चा करणार नाही. आज आम्ही तुम्हाला सांगतोय एका विचित्र ओव्हरबद्दल. जी ओव्हर पूर्ण करायला एक नाही दोन नाही तर तीन बोलर्स लागले होते. ही ओव्हर टाकणाऱ्या बोलर्समधील एक बोलर मर्वन डिल्‍लन (Mervyn Dillon) यांचा आज वाढदिवस आहे. (One over thrown by three bowlers Mervyn Dillon In West Indies vs Sri Lanka Test Match At Kandy)

तर ही घटना आहे, 21 नोव्हेंबर 2001 रोजीची. वेस्‍ट इंडीज (West Indies) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) या संघात झालेल्या कसोटी सामन्यात ही गजब ओव्हर टाकण्यात आली होती. सामन्यात वेस्ट इंडिजचे बोलर मर्वन डिल्‍लन हे ओव्हर टाकत होते. अचानक त्यांच्या पोटात दुखू लागले. दोन बॉल टाकल्यानंतर त्यांचा त्रास वाढला ज्यामुळे ते पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे त्यांची उर्वरीत ओव्हर कोलिन स्‍टुअर्ट यांना टाकण्यास दिली. कोलिन यांनी तिसरा बॉलतर ठिक टाकला. पण त्यानंतर त्यांनी दोन फुल टॉस बॉल टाकल्याने ते नो बॉल देत त्यांच्याकडून ओव्हर काढून घेण्यात आली. त्यामुळे उर्वरीत ओव्हर ख्रिस गेलला दिली जी त्याने योग्यरित्या टाकून पूर्ण केली. अशारितीने एक ओव्हर टाकण्यासाठी तिघा बॉलर्सना गोलंदाजी करावी लागली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी एकमेव ओव्हर आजपर्यंत टाकण्यात आली आहे.

मर्वन डिल्लन यांची कारकिर्द

डिल्‍लन यांचा जन्‍म 5 जून 1974 रोजी त्रिनिदादमध्ये झाला होता. वेस्ट इंडिज संघाचे महत्त्वाचे गोलंदाज असणारे डिल्लन यांनी 131 कसोटी सामने खेळले. ज्यात एका डावात 71 धावा देत पाच विकेट घेणे हा त्यांचा सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड ठरला. तर संपर्ण सामन्यात 123 धावा देत आठ विकेट घेणे हा त्यांचा सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्यांनी 108 एकदिवसीय सामन्यात 130 विकेट्स घेतल्या ज्यात 29 धावा देत पाच विकेट हा त्यांता बेस्ट रेकॉर्ड आहे.

हे ही वाचा :

16 वर्षांच्या फलंदाजाने घडवला इतिहास जो 131 वर्षांत कुणालाही घडवता आला नाही!

IPL रंगणार खरी पण विदेशी खेळाडूंचे धक्के सुरुच, आता बांगलादेशच्या या दोन खेळाडूंचा उर्वरित सामन्यांना रामराम!

IPL 2021 पूर्वीच दिग्गज क्रिकेटर्सचा टी-20 धमाका, क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी

(One over thrown by three bowlers Mervyn Dillon In West Indies vs Sri Lanka Test Match At Kandy)