India vs leicestershire : भारतीय गोलंदाजच टीम इंडियावर भारी, राखीव आणि नेट बॉलर्सनं दिल धक्का, पाहा तिसऱ्या दिवशी काय झालं?

| Updated on: Jun 26, 2022 | 2:32 PM

भारतीय संघाचा नेटस्पिनर आर साई किशोरनेही गोलंदाजी केली आणि त्याने चेतेश्वर पुजाराला त्याच्या फ्लाईट आणि फिरकीत षटकार ठोकून बाद केले. दुसरीकडे टीम इंडियाचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या सामन्यातील पहिल्या यशासाठी बराच काळ वाट पाहावी लागली

India vs leicestershire : भारतीय गोलंदाजच टीम इंडियावर भारी, राखीव आणि नेट बॉलर्सनं दिल धक्का, पाहा तिसऱ्या दिवशी काय झालं?
पाचव्या आणि शेवटच्या कसोटीची तयारी
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : भारत आणि लीसेस्टरशायर (India vs leicestershire) काऊंटी क्लब यांच्यातील सराव सामन्याला तीन दिवस पूर्ण झाले असून भारतीय क्रिकेट संघाने (India cricket team) आतापर्यंत भरपूर सराव केला आहे. या सामन्यात आतापर्यंत टीम इंडियाच्या फलंदाजांची सतत चर्चा होत आहे. भारताचे (India)  बहुतेक फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात चुकले आहेत. पण गोलंदाजांबद्दल फारसे बोलले जात नाही. खासकरून ते गोलंदाज , जे लीसेस्टरशायरच्या टीम इंडियाविरुद्ध आपली क्षमता दाखवत आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी याच भारतीय गोलंदाजांनी 9 पैकी 7 विकेट घेतल्या. चार दिवसीय सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भरताने दुसऱ्या डावाला सुरुवात केली, ती तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने पुढे केली. दिवसाच्या खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 9 गडी गमावून 364 धावा केल्या. त्यात विराट कोहली आणि रवींद्र जडेजानं अर्धशतक झळकावली, तर श्रेयस अय्यरनेही दोनदा फलंदाजी करताना एकूण 62 धावा केल्या. विराट कोहलीच्या अर्धशतकाचीच चर्चा अधिक असली तरी नवदीप सैनी, कमलेश आणि अन्य भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवली.

अय्यर डावाच्या 42 व्या षटकात 30 धावांवर बाद झाला आणि 74 व्या षटकात त्याला पुन्हा फलंदाजीला पाठवण्यात आल. त्प्रमाणे, जडेजा 33 व्या षटकात शून्यावर गेला होता. 31 षटकांनंतर क्रीजवर आल्यानं विराट कोहलीची भागीदारी केली.

पाहा खास व्हिडीओ

कोहलीची विकेट पडल्यानंतर अय्यर जडेजासोबत क्रीझवर

सर्वाधिक यशस्वी कामगिरी

टीम इंडियानेही काही सदस्यांना लीसेस्टरशायरच्या संघात पाठवले आहे. यामुळे त्यांच्या सर्व खेळाडूंना कसोटी सामन्यापूर्वी एकमेव सराव सामन्यात सरावाची संधी द्यावी. शनिवारी संघासोबत गेलेल्या राखीव आणि नेट गोलंदाजांनी लीसेस्टरशायरकडून आघाडी घेतली आणि असे म्हणता येईल की या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांना त्रास दिला. विशेषत: वेगवान गोलंदाज नवदीप सैनी, ज्याने शुभमन गिल, श्रीकर भरत आणि रवींद्र जडेजा यांची विकेट घेतली. त्याचवेळी युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीनेही प्रभावित करत दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या.

भारतीय संघाचा नेटस्पिनर आर साई किशोरनेही गोलंदाजी केली आणि त्याने चेतेश्वर पुजाराला त्याच्या फ्लाईट आणि फिरकीत षटकार ठोकून बाद केले. दुसरीकडे टीम इंडियाचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या सामन्यातील पहिल्या यशासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. पहिल्या डावात रिकाम्या हाताने आलेल्या बुमराहला दुसऱ्या डावातही बऱ्याच कालावधीनंतर विकेट मिळाली. मात्र, त्याने चांगली खेळी खेळणाऱ्या विराट कोहलीची विकेट घेतली. म्हणजेच एकंदरीत भारतीय गोलंदाजांनी आपली छाप सोडली. आपल्याच वरिष्ठ सहकाऱ्यांना अडचणीत टाकले.