Ranji Trophy Final 2022: रणजी विजेतेपदाच्या शर्यतीत मध्य प्रदेश मुंबईवर भारी, जाणून घ्या फायनलमधील चौथ्या दिवसाचे Update

Ranji Trophy Final 2022: मध्य प्रदेश आणि मुंबई (Mumbai vs Madhya pradesh) या दोन संघांमध्ये रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. चौथ्या दिवस अखेर मध्य प्रदेशचा संघ मजबूत स्थिती मध्ये आहे.

Ranji Trophy Final 2022: रणजी विजेतेपदाच्या शर्यतीत मध्य प्रदेश मुंबईवर भारी, जाणून घ्या फायनलमधील चौथ्या दिवसाचे Update
rajat-patidar
Image Credit source: BCCI
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 25, 2022 | 6:59 PM

मुंबई: मध्य प्रदेश आणि मुंबई (Mumbai vs Madhya pradesh) या दोन संघांमध्ये रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. चौथ्या दिवस अखेर मध्य प्रदेशचा संघ मजबूत स्थिती मध्ये आहे. कालच्या तीन बाद 368 धावांवरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर मध्य प्रदेशचे आज आणखी 168 धावांची भर घातली. मध्य प्रदेशने पहिल्या डावात सर्वबाद 536 धावा केल्या. मध्य प्रदेशने पहिल्या डावात मुंबईवर 162 धावांची आघाडी घेतली. आता उद्याचा शेवटचा दिवस शिल्लक राहिला असून मध्य प्रदेशकडे अजूनही 49 धावांची आघाडी आहे. म्हणजे मुंबईला हा लीड फेडून एका दिवसात नवीन धावसंख्या उभारावी लागेल. त्यानंतर मध्य प्रदेशला ऑलआऊट करावं लागेल. तूर्तास तरी हे खूप कठीण दिसतय. आयपीएल स्टार रजत पाटीदारच (Rajat Patidar) शतक हे आजच्या दिवसाच्या खेळाचं वैशिष्टय ठरलं. आज सकाळी त्याने 67 धावांवरुन डाव पुढे सुरु केला. त्याने 219 चेंडूत 122 धावा फटकावल्या. त्याला तृषार देशपांडेनं बाद केलं. आपल्या शतकी खेळीत त्याने 20 चौकार मारले.

इथे क्लिक करुन पहा रजत पाटीदारची शानदार शतकी खेळी

मध्य प्रदेशकडून तीन शतकं

आज आदित्य श्रीवास्तवच्या रुपाने मुंबईला पहिलं यश मिळालं. संघाची धावसंख्या 401 असताना, तो आऊट झाला. अवस्थीने त्याला 25 धावांवर सर्फराज खानकरवी झेलबाद केलं. त्यानंतर ठराविक अंतराने मध्य प्रदेशचे फलंदाज बाद होते गेले. खालच्या क्रमांकावर फलंदाजील आलेल्या सारांश जैनने 57 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. मध्य प्रदेशकडून यश दुबे (133), शुभम शर्मा (116) आणि रजत पाटीदार ( 122) अशी तिघांनी शतक झळकावली. त्या तुलनेत मुंबईकडून फक्त सर्फराज खानने (134) धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

पहा एकाडावात पाच विकेट घेणाऱ्या शम्स मुलानीची गोलंदाजी

मुंबईच्या दोन विकेट

चौथ्या दिवस अखेर मुंबईच्या दोन बाद 113 धावा झाल्या आहेत. अजूनही मुंबईचा संघ 49 धावांनी पिछाडीवर आहे. कॅप्टन पृथ्वी शॉ (44) धावांवर बाद झाला. त्याला गौरव यादवने यश दुबेकरवी झेलबाद केलं. पृथ्वीने 52 चेंडूत 44 धावांच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. हार्दिक तामेरेला (25) धावांवर कुमार कार्तिकेयने बोल्ड केलं. आता अरमान जाफर (30) आणि सुवेद पारकर (9) धावांवर खेळत आहेत.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें