PAK vs BAN: मुशफिकुर पुरुन उरला, पाकिस्तान विरुद्ध कडक खेळी, बांगलादेशकडे 117 धावांची आघाडी
Pakistan vs Bangladesh 1st Test: पाकिस्तानला आपला पहिला डाव घोषित करणं महागात पडलंय. बांगलादेशने पहिल्या डावात 500 पार मजल मारत 117 धावांची आघाडी घेतली. बांग्लादेश यासह भक्कम स्थितीत पोहचली आहे.

बांगलादेश पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी भक्कम स्थितीत पोहचली आहे. यजमान पाकिस्तानने बांगलादेशच्या बॅटिंगसमोर गुडघे टेकले. पाकिस्तानने पहिल्या डावात 448 धावा केल्या. बांग्लादेशने या 448 च्या प्रत्युत्तरात 565 धावा केल्या. बांगलादेशने यासह पहिल्या डावात 117 धावांची आघाडी घेतली. बांगलादेशने या आघाडीसह सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. बांगलादेशकडून अनुभवी फंलदाज मुशफिकुर रहीमने सर्वाधिक धावा केल्या. मात्र त्याचं द्विशतक अवघ्या 9 धावांनी हुकलं.
मुशफिकुरने 341 बॉलमध्ये 191 धावांची खेळी केली. मुशफिकुर द्विशतकाच्या उंबरठ्यावर होता. मात्र मोहम्मद अली याने मुशफिकुरला विकेटकीपर मोहम्मद रिझवान याच्या हाती कॅच आऊट केलं. विकेटकीपर लिटॉस दास याने 56 धावांची खेळी केली. तर मेहदी हसन मिराजने 179 बॉलमध्ये 77 रन्स केल्या. बांगलादेशने पहिल्या डावात ऑलआऊट 565 धावा केल्या. ओपनर शादमन इस्लाम 183 बॉलमध्ये 93 रन्सवर आऊट झाला. तर मोमिनुल हक याने 50 धावा केल्या. बांगलादेशची पाकिस्तान विरुद्धची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
तर पाकिस्तानकडून नसीम शाह याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शाहीन अफ्रिदी, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर सॅम अय्युबला 1 विकेट मिळाली. पाकिस्तान या सामन्यात स्पिनरशिवाय खेळत आहे. त्यामुळे पाकिस्तानने पार्ट टाईम स्पिनर आगा सलमान याला बॉलिंग दिली. मात्र आगा बांगलादेशच्या बॅटिंगसमोर निष्प्रभ ठरला. सलमानने 41 ओव्हरमध्ये 136 धावा लुटवल्या. मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही.
बांगलादेशची सामन्यावर घट्ट पकड
Bangladesh posts their highest-ever total against Pakistan, piling up a massive 565 runs before being bowled out!
PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/HwHYIMNELp
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 24, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.