
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात ए ग्रुपमधील पाकिस्तान विरुद्ध कॅनडा हे संघ आमनेसामने असणार आहेत. साद बिन जफर कॅनडाचं नेतृत्व करणार आहे. बाबर आझम याच्याकडे पाकिस्तानची धुरा आहे. पाकिस्तान आणि कॅनडा या दोन्ही संघांचा साखळी फेरीतील तिसरा सामना आहे. कॅनडाने 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे कॅनडाला हा सामना जिंकून सुपर 8 च्या दिशेने जाण्याची संधी आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसाठी हा करो या मरो असा सामना आहे. त्यामुळे या सामना चांगलाच अटीतटीचा होणार आहे.
पाकिस्तानने आपले साखळी फेरीतील दोन्ही सामने गमावले आहेत. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात नवख्या यूएसएकडून सुपर ओव्हरमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. आता पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत कॅनडा विरुद्ध जिंकावंच लागणार आहे. आता हा सामना कोण जिंकणार, हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
पाकिस्तान विरुद्ध कॅनडा सामना मंगळवारी 11 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध कॅनडा सामना नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे पार पडणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध कॅनडा सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
पाकिस्तान विरुद्ध कॅनडा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
पाकिस्तान विरुद्ध कॅनडा सामना मोबाईलवर फुकटात डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
कॅनडा टीम: साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, दिलप्रीत बाजवा, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), डिलन हेलिगर, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, जेरेमी गॉर्डन, निखिल दत्ता, ऋषीव राघव जोशी, रायान पठाण आणि रविंदरपाल सिंग.
पाकिस्तान टीम : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, फखर जमान, इमाद वसीम, शादाब खान, इफ्तिखार अहमद, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर, अबरार अहमद, सैम अयुब, आझम खान आणि अब्बास आफ्रिदी.