PAK vs ENG 1st Test: टेस्टमध्ये T20 चा फिल, 6 चेंडू 6 चौकार, पाकिस्तानी गोलंदाजांना धुणारा हा इंग्रज कोण?

PAK vs ENG: पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या चार फलंदाजांनी ठोकली शतकं, उभारला धावांचा डोंगर.....

PAK vs ENG 1st Test: टेस्टमध्ये T20 चा फिल, 6 चेंडू 6 चौकार, पाकिस्तानी गोलंदाजांना धुणारा हा इंग्रज कोण?
England palyerImage Credit source: Getty Images
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 6:03 PM

लाहोर: पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. 17 वर्षानंतर इंग्लंडची टीम पाकिस्तानात टेस्ट सीरीज खेळण्यासाठी आली आहे. आज रावळपिंडी टेस्टचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी इंग्लंडने यजमान टीमची चांगली धुलाई केली. आजच्या पहिल्या दिवसाच वैशिष्टय ठरलं, हॅरी ब्रूकच शानदार शतक आणि साउद शकीलची धुलाई.

मिळालेल्या संधीचा उचलला फायदा

रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या दिवशी मीडल ऑर्डरचा फलंदाज हॅरी ब्रूकला फलंदाजीची संधी मिळाली. त्याने मिळालेल्या संधीचा फायदा उचलत शानदार शतक झळकावलं.

पुढच्या 12 चेंडूत 8 चौकार

ब्रूकने टेस्ट मॅच असली, तरी वनडे स्टाइल फलंदाजी केली. त्याने 52 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढच्या 12 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 34 धावा कुटल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज साऊद शकीलच्या एका ओव्हरमध्ये ब्रूकने 6 चेंडूत 6 चौकार मारले.

पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या 506 धावा

करिअरमधील दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या ब्रूकने टेस्ट करिअरमधील पहिलं शतक झळकावलं. टेस्ट क्रिकेटमध्ये ब्रूकने फक्त 80 चेंडूत शतक केलं. ब्रूक या इनिंगमध्ये शतक ठोकणारा इंग्लंडचा चौथा फलंदाज ठरला. त्याच्याआधी टीमचे दोन्ही ओपनर, जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी शतक झळकावलं. ओली पोपने टेस्ट करिअरमधील तिसर शतक झळकावलं. हॅरी ब्रूक 101 धावांवर नाबाद आहे. इंग्लंडने पहिल्याच दिवशी 4 बाद 506 धावा केल्या.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.