AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : क्लासेन आणि रिझवान सामना सुरु असताना भिडले, बाबर आझमने प्रकरण केलं शांत

पाकिस्तानने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 81 धावांनी पराभूत केलं. पण या सामन्यात एक प्रसंग असा आला की हेनरिक क्लासेन आणि पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आमनेसामने आले.

Video : क्लासेन आणि रिझवान सामना सुरु असताना भिडले, बाबर आझमने प्रकरण केलं शांत
Image Credit source: video grab
| Updated on: Dec 20, 2024 | 6:05 PM
Share

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागले. पाकिस्तानने सर्व गडी बाद 149.5 षटकात 329 धावा केल्या आणि विजयासाठी 330 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही दक्षिण अफ्रिकेला गाठता आलं नाही. दक्षिण अफ्रिकेचा संघ 43.1 षटकात सर्व गडी बाद 248 धावा करू शकला आणि 81 धावांनी पराभूत झाला. हा सामना जिंकून पाकिस्तानने मालिका खिशात घातली. पण क्लासेनने दक्षिण अफ्रिकेच्या विजयासाठी कडवी झुंज दिली. 74 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 97 धावा केल्या. पण त्याची ही खेळी व्यर्थ गेली. पण सामन्यात एक प्रसंग असा आला होता की पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि हेनरिक क्लासेन एकमेकांसमोर उभे ठाकले आणि वादावादी सुरु झाली. त्यामुळे हे प्रकरण सोडवण्यासाठी पंच आणि खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला.

दक्षिण अफ्रिकेच्या डावात 26वं षटक पाकिस्तानकडून मोहम्मह हारिस रउफ टाकत होता. आखुड टप्प्याचा एक चेंडू हेनरिक क्लासेनने सोडला. त्यानंतर हारिस रउफने क्लासेनला डिवचलं आणि काहीतरी बोलला. त्यावर क्लासेनने प्रत्युत्तर दिलं. या वादात पाकिस्तानचा विकेटकीपर कर्णधार मोहम्मद रिझवानही उतरला. त्यावर क्लासेन आणि मिलरने रिझवानला काहीतरी बोलत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. क्लासेनचा रोष पाहून पंच आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम यांनी धाव घेत प्रकरण शांत केलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले फेहलुकवायो, ब्योर्न फोर्टुइन, क्वेना माफाका, तबरेझ शम्सी.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर/कर्णधार), कामरान गुलाम, सलमान आगा, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद

भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.