Salman Agha याची 3 दिवसांनी वाईट स्थिती, रवींद्र जडेजा याच्या बॉलिंगवर गंभीर दुखापत

Salman Agha Viral Photo | खेळ म्हटलं की दुखापत आलीच. पण दुखापत होऊ नये, यासाठी क्रिकेटपटू काळजी घेतात. मात्र पाकिस्तानच्या सलमान आघा याला हेल्मेट न वापरणं चांगलंच महागात पडलं. आता त्याचा चेहरा कसा झालाय बघा.

Salman Agha याची 3 दिवसांनी वाईट स्थिती, रवींद्र जडेजा याच्या बॉलिंगवर गंभीर दुखापत
| Updated on: Sep 14, 2023 | 10:30 PM

कोलंबो | टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात सुपर 4 मध्ये पाकिस्तानवर 228 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयासह बांगलादेशचा सुपर 4 मधून पत्ता कट झाला. तर त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी खेळताना टीम इंडियाने 12 सप्टेंबरला श्रीलंकेचा पराभव केला. टीम इंडियाने या विजयासह आशिया कप 2023 फायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडिया फायनलमध्ये पोहचणारी टीम ठरली. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला टीम इंडिया विरुद्धच्या पराभवानंतर आणखी एक झटका लागला. टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या सलमान आघा याला रवींद्र जडेजा याच्या बॉलिंगवर दुखापत झाली.

नक्की काय झालं होतं?

सलमान आघा टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा याच्या बॉलिंगवर विनाहेल्मेट खेळत होता. आघाने जडेजाच्या बॉलिंगवर पॅडल स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला. अंदाज चुकल्याने आघाच्या चेहऱ्यावर जडेजाने टाकलेला बॉल आदळला. त्यामुळे आघा रक्तबंबाळ झाला. रक्त वाहू लागल्याने मेडीकल टीम मैदानात आली. आघाच्या जखमेवर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर आघा खेळायला लागला. मात्र काही वेळात तो तंबूत परतला.

सलमान आघाची हेल्मेट न घातल्याने झालेली स्थिती


सलमानची एक चूक त्याच्यासह पाकिस्तान टीमलाही चांगलीच महागात पडली. सलमानला या दुखापतीमुळे श्रीलंका विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं आहे. सलमान आघा आता केव्हापर्यंत टीममध्ये परतेल, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र दरम्यान सलमानचा दुखापतीनंतरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत सलमानचा चेहऱ्यावर बॉलचा फटका लागल्याने तो भाग काळा पडला आहे. त्यामुळे बॅटिंगदरम्यान आणि आवश्यक तिथे हेल्मेटचा वापर किती महत्त्वाचा असतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.