AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babar Azam चा सेक्सटिंगचा व्हिडिओ व्हायरल, हनी ट्रॅपमध्ये फसला पाकिस्तानी कॅप्टन

Babar Azam: बाबर आजमवर याआधी सुद्धा एका महिलेने लैंगिक शोषण, धमकावण आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप केला होता. पाकिस्तानी कॅप्टनने लग्नाच आश्वासन देऊन लैंगिक शोषण केलं. बाबरमुळे गर्भपात केल्याचा आरोप पीडित महिलेने केला होता.

Babar Azam चा सेक्सटिंगचा व्हिडिओ व्हायरल, हनी ट्रॅपमध्ये फसला पाकिस्तानी कॅप्टन
babar-azamImage Credit source: twitter
| Updated on: Jan 17, 2023 | 10:30 AM
Share

Babar Azam Video Viral: पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आतापर्यंत त्याच्या कॅप्टनशिपवर संकट होतं. पण आता त्याच्या इमेजला डाग लागला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार बाबर आजमला हनी ट्रॅपमध्ये पकडलय. रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानी टीममधील सहकारी खेळाडूच्या गर्लफ्रेंडसोबत बाबरला सेक्सटिंग करताना पकडलय. त्याचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर बाबरचा खासगी फोटो शेअर करण्यात आलाय.

ऑडियो रेकॉर्डिंग सोशल मीडियावर लीक

बाबरच्या नेतृत्वाखाली मागच्यावर्षी पाकिस्तानी टीम ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. सध्या टीमच्या खराब परफॉर्मन्समुळे सातत्याने बाबर आजमच नाव चर्चेत आहे. यावेळी तो पुन्हा एकदा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. पाकिस्तानी कॅप्टनचे खासगी फोटो आणि ऑडियो रेकॉर्डिंग सोशल मीडियावर लीक झाले आहेत. रविवार रात्रीपासूनच पाकिस्तानी कॅप्टनच्या या अशा फोटोंवरुन वाद निर्माण झालाय. काहींच्या मते ही बाबर आजमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे.

बाबर आजमवर लैंगिक शोषणाचा आरोप

बाबर आजमवर याआधी सुद्धा एका महिलेने लैंगिक शोषण, धमकावण आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप केला होता. महिलेने नंतर तिची तक्रार मागे घेतली होती. या प्रकरणात लाहोरच्या कोर्टाने बाबर विरोधात खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते. 2020 मध्ये एका महिलेने आरोप केला होता. पाकिस्तानी कॅप्टनने लग्नाच आश्वासन देऊन लैंगिक शोषण केलं. बाबरमुळे गर्भपात केल्याचा आरोप पीडित महिलेने केला होता. आरोप करणाऱ्या महिलेने नंतर सर्व आरोप खोटे असल्याच म्हटलं होतं. बाबर पुन्हा एकदा वादात फसला आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. कॅप्टनशिपवर संकट

बाबर आजमच कर्णधारपद धोक्यात आहे. टीमवरील बाबरची पकड कमजोर झालीय. पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड तिन्ही फॉर्मेटसाठी वेगवेगळे कॅप्टन नियुक्त करण्याचा विचार करतेय, अशी बातमी आली होती. शान मसूदला कॅप्टनशिपचा मजबूत दावेदार मानलं जातय. न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये तो उपकर्णधार होता,

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.