Asian Games 2026 : भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार? माइक हेसन यांच्या वक्तव्याने वाढला सस्पेन्स

टीम इंडिया एशियन गेम्समध्ये आपली प्रतिभा दाखवणार आहे. 28 सप्टेंबर पासून खेळाला सुरुवात होणार आहे. भारताच्या कोट्यवधी चाहत्यांचं लक्ष याकडे लागलं आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याचीही चाहत्यांना प्रतिक्षा लागली आहे.

Asian Games 2026 : भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार? माइक हेसन यांच्या वक्तव्याने वाढला सस्पेन्स
Pakistan Coach Mike Hesson India Praise
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 8:55 PM

जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच भारत-पाकिस्तान संभाव्य सामन्याची चर्चा रंगू लागली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार असून अंतिम फेरी किंवा कांस्यपदकाच्या सामन्यातच दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात. असे असतानाच पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी भारतीय संघाचे तोंडभरून कौतुक केले आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये भारताने सध्या एक वेगळाच दर्जा निर्माण केला असून त्यांची बरोबरी करणे हे पाकिस्तानसमोरील मोठे आव्हान असल्याचे हेसन यांनी म्हटले आहे.

भारताविरुद्ध दडपण आणणार

पाकिस्तानचा संघ जपानला रवाना होण्यापूर्वी हेसन यांनी भारताविरुद्धच्या संभाव्य सामन्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला, तर आशिया चषकाच्या अंतिम सामन्याप्रमाणे भारतावर दडपण आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. मात्र, अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना अनेक सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे सध्या त्यापुढचा विचार करत नसल्याचेही हेसन यांनी स्पष्ट केले. भारताने गेल्या 6 सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केले आहे. यामध्ये आशिया चषक 2025 मधील 3 सामनेही आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये पुन्हा सामना झाल्यास तो रंगतदार होण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघांच्या रणनीती वेगळ्या

या स्पर्धेसाठी पाकिस्तानने काही अनुभवी खेळाडूंसह युवा आणि राखीव खेळाडूंना अधिक संधी दिली आहे. याउलट भारताने सुवर्णपदकाच्या उद्देशाने आपला पूर्ण ताकदीचा मुख्य संघ मैदानात उतरवला आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या रणनीतीमध्ये मोठा फरक पाहायला मिळणार आहे. भारतीय संघ 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता उपांत्यपूर्व फेरीत गट अ मधील उपविजेत्या संघाविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 1 ऑक्टोबरला संभाव्य उपांत्य सामना, तर 3 ऑक्टोबरला सुवर्ण किंवा कांस्यपदकाचा सामना होईल. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना नेमका कोणत्या टप्प्यावर होतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us