AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागलं भिकेला! स्पर्धेपूर्वीच उचलावं लागलं असं पाऊल

चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करणार असा मोठा गाजावाजा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला होता. मात्र प्रत्यक्षात पाकिस्तानची आर्थिक स्थिती पाहता हा खर्च पेलवेल का? हा प्रश्न होता. अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भिकेला लागल्याचं उघड झालं आहे. कारण खर्च भागवण्यासाठी पाकिस्तान बोर्ड अध्यक्ष मोहसिन नकवी यांना असं काही केलं की आश्चर्य व्यक्त होत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागलं भिकेला! स्पर्धेपूर्वीच उचलावं लागलं असं पाऊल
| Updated on: Feb 17, 2025 | 10:17 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना 23 फेब्रुवारील दुबईत होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी दोन्ही देशांचे प्रमुख पाहुणे उपस्थिती लावणार यात काही शंका नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवीही हा सामना पाहायला जाणार यात काही शंका नाही. मोहसिन नकवी यांना हा सामना पाहण्यासाठी 30 बैठक असलेल्या व्हिआयपी हॉस्पिलिटी बॉक्स मिळला होता. त्यांना या व्हिआयपी बॉक्समधून सामना पाहण्याची संधी होती. पण नकवी यांनी स्टँडमध्ये बसून सामना पाहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण नकवींनी पीसीबीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व्हिआयपी बॉक्सची तिकीटं विकली. समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार, मोहसिन नकवी यांनी व्हिआयपी बॉक्सची ऑफर धुडकावली आहे. तसेच भारत पाकिस्तान सामना स्टँडमध्ये बसून बघणार असल्याचं सांगितलं आहे. दुबई स्टेडियममध्ये व्हिआयपी बॉक्सची किंमत 4 लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच 3.47 कोटी रुपये आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांना असा निर्णय का घ्यावा लागला? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आता इतके पैसेही नाहीत का? आर्थिक स्थिती खालावल्याने पीसीबी अध्यक्षांना तिकीटं विकण्याची वेळ आली? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये स्टेडियमचं कामंही अर्धवट असल्याचं बोललं जात आहे. स्पर्धेदरम्यान याबाबत चित्र काय ते स्पष्ट होईल. कारण स्पर्धा जवळ आली तरी काम सुरुच होतं. त्यामुळे अर्धवट स्थितीत असलेल्या मैदानात सामने कसे खेळवणार असा प्रश्न क्रीडाप्रेमींना विचारला होता. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सर्वकाही व्यवस्थित असल्याचं सांगत आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 1998 सुरुवात झाली होती. आतापर्यंत एकूण 8 पर्व पार पडली आहेत. यंदाचं नववं पर्व असून एकूण 8 संघांनी भाग घेतला आहे. भारत आणि पाकिस्तान यांचा पाचवेळा आमनासामना झाला. पाकिस्तानचा संघ भारतावर तीन वेळा भारी पडला आहे. तर भारताने फक्त दोन वेळा विजय मिळवला आहे. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने पाकिस्तानला साखळी फेरीत पराभूत केलं होतं. पण अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताचा धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. आता दोन्ही संघ सहाव्यांदा भिडणार आहेत.

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना