
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना 23 फेब्रुवारील दुबईत होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी दोन्ही देशांचे प्रमुख पाहुणे उपस्थिती लावणार यात काही शंका नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवीही हा सामना पाहायला जाणार यात काही शंका नाही. मोहसिन नकवी यांना हा सामना पाहण्यासाठी 30 बैठक असलेल्या व्हिआयपी हॉस्पिलिटी बॉक्स मिळला होता. त्यांना या व्हिआयपी बॉक्समधून सामना पाहण्याची संधी होती. पण नकवी यांनी स्टँडमध्ये बसून सामना पाहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण नकवींनी पीसीबीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व्हिआयपी बॉक्सची तिकीटं विकली. समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार, मोहसिन नकवी यांनी व्हिआयपी बॉक्सची ऑफर धुडकावली आहे. तसेच भारत पाकिस्तान सामना स्टँडमध्ये बसून बघणार असल्याचं सांगितलं आहे. दुबई स्टेडियममध्ये व्हिआयपी बॉक्सची किंमत 4 लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच 3.47 कोटी रुपये आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांना असा निर्णय का घ्यावा लागला? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आता इतके पैसेही नाहीत का? आर्थिक स्थिती खालावल्याने पीसीबी अध्यक्षांना तिकीटं विकण्याची वेळ आली? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये स्टेडियमचं कामंही अर्धवट असल्याचं बोललं जात आहे. स्पर्धेदरम्यान याबाबत चित्र काय ते स्पष्ट होईल. कारण स्पर्धा जवळ आली तरी काम सुरुच होतं. त्यामुळे अर्धवट स्थितीत असलेल्या मैदानात सामने कसे खेळवणार असा प्रश्न क्रीडाप्रेमींना विचारला होता. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सर्वकाही व्यवस्थित असल्याचं सांगत आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 1998 सुरुवात झाली होती. आतापर्यंत एकूण 8 पर्व पार पडली आहेत. यंदाचं नववं पर्व असून एकूण 8 संघांनी भाग घेतला आहे. भारत आणि पाकिस्तान यांचा पाचवेळा आमनासामना झाला. पाकिस्तानचा संघ भारतावर तीन वेळा भारी पडला आहे. तर भारताने फक्त दोन वेळा विजय मिळवला आहे. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने पाकिस्तानला साखळी फेरीत पराभूत केलं होतं. पण अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताचा धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. आता दोन्ही संघ सहाव्यांदा भिडणार आहेत.