IND vs PAK सामन्याआधी या खेळाडूच्या कृतीमुळे सोशल मीडियावर खळबळ, नक्की काय झालं?

T20 World Cup 2024: क्रिकेटच्या रणसंग्रामाला अर्थात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात झाली आहे. 9 जून रोजी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. त्याआधी एका क्रिकेटरच्या कृतीची सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळत आहे.

IND vs PAK सामन्याआधी या खेळाडूच्या कृतीमुळे सोशल मीडियावर खळबळ, नक्की काय झालं?
ind vs pak flag cricket
| Updated on: Jun 03, 2024 | 7:28 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात झाली. या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ ए ग्रुपमध्ये आहेत. उभयसंघात रविवारी 9 जून रोजी सामना होणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानचा विकेटकीपर बॅट्समन आजम खान याने केलेल्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. आजम खान याला गेल्या काही दिवसात निराशाजनक कामगिरीमुळे टीकेचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजमने घेतलेल्या त्या एका निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांनाही टेन्शन आलंय.

टी 20 वर्ल्ड कप आधी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20 मालिका पार पडली. आजम या मालिकेत अपयशी ठरला. त्यामुळे आजमवर टीका झाली. इतकंच नाही, तर आजमवर फिटनेसवरुनही निशाणा साधला गेला. आजमवर झालेल्या ट्रोलिंगनंतर त्याने इंस्टाग्रामवरुन सर्व पोस्ट हटवल्या आहेत. क्रिकेटरच्या कृतीमुळे चाहत्यांना टेन्शन आलंय. आजमच्या या कृतीमुळे टी 20 वर्ल्ड कप सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेआधी क्रिकेटर तणावाखाली असल्याचं म्हटलं जात आहे.

आजम खानला आयर्लंड विरुद्ध 0, 30* आणि 18* धावा केल्या. तर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील 2 सामने पावसामुळे वाया गेले. तर आजमने 2 सामन्यात 11 आणि 0 अशा धावा केल्या. आजमच्या या कामगिरीनंतर त्याच्या निवडीवरुनही सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली. दरम्यान पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 6 जून रोजी अमेरिके विरुद्ध करणार आहे. त्यानंतर पाकिस्तानचा सामना हा टीम इंडिया विरुद्ध 9 जून रोजी होणार आहे.

आजम खाने इंस्टा पोस्ट हटवल्याचा दावा

टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम : बाबर आजम (कप्तान), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी आणि उस्मान खान.