जिथे रुट 5 विकेट घेतो, तिथे अश्विन-अक्षरचं कौतुक कशाला, मोदी मैदानाच्या खेळपट्टीवर कारवाई करा : इंझमाम

भारताने (Team India) जिंकलेली तिसरी कसोटी अवघ्या दोन दिवसात संपली. त्यामुळे या मैदानाच्या खेळपट्टीवर दिग्गज क्रिकेटपटू प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:10 PM, 3 Mar 2021
जिथे रुट 5 विकेट घेतो, तिथे अश्विन-अक्षरचं कौतुक कशाला, मोदी मैदानाच्या खेळपट्टीवर कारवाई करा : इंझमाम
Inzamam ul Haq

मुंबई : भारत आणि इंग्लंड (India vs England 3rd test) यांच्यात जगातील सर्वात मोठं स्टेडियम नरेंद्र मोदी मैदानात (Narendra Modi stadium Ahmadabad) झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यावरुन वादळ उठलं आहे. भारताने (Team India) जिंकलेली ही कसोटी अवघ्या दोन दिवसात संपली. त्यामुळे या मैदानाच्या खेळपट्टीवर दिग्गज क्रिकेटपटू प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर, भारताचा माजी सलामीवार गौतम गंभीर, सर व्हिव रिचर्ड्स यांनी आपली मतं मांडली आहेत. कोणी खेळपट्टीवर (Ahmadabad cricket pitch) टीका करत आहेत, तर कोणी बाजू घेत आहेत. आता यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकची (Pakistan cricketer Inzamam ul Haq) भर पडली आहे.

ज्या खेळपट्टीवर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट, ज्याने पार्टटाईम गोलंदाजी करुन 8 धावात 5 विकेट्स घेतल्या, तिथे भारताच्या आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या गोलंदाजीचं कौतुक काय करायचं, असा थेट सवाल इंझमामने उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर आयसीसीने नरेंद्र मोदी मैदानाच्या खेळपट्टीवरुन बीसीसीआयवर कारवाई करावी, अशी मागणीही इंझमामने केली आहे.

इंझमाम नेमकं काय म्हणाला?

दोन दिवसात कसोटी संपणं हे हैराण करणारं आहे. मला आठवत नाही यापूर्वी अशी घटना घडली होती. भारताने चांगली कामगिरी केली असं म्हणावं लागेल. खराब खेळपट्टीवर इंग्लंडला पहिली फलंदाजी करावी लागली. त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. भारताला चौथ्या डावात खेळून मॅच जिंकली. पेपरवर भारतासाठी अवघड होतं, मात्र तरीही भारत जिंकला.

एक प्रश्न जरुर उपस्थित होतो, तो म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये अशा पद्धतीच्या खेळपट्टी असावी का? भारताने गेल्या काही दिवसात जबरदस्त कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा पराक्रम गाजवला, इतकंच नाही तर इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी गमावल्यानंतर, दुसऱ्या कसोटीत जोरदार कमबॅक केलं. मात्र अशापद्धतीच्या खेळपट्ट्या बनवणं हे क्रिकेटसाठी योग्य नाही.

स्कोअर कार्ड पाहिलं तर हे टी ट्वेण्टीचंही स्कोअरकार्ड असं नसतं. आयसीसीने याबाबत कारवाई करायला हवी. दोन दिवसात कसोटी सामना कसा काय संपू शकतो, असा सवाल इंझमामने केला आहे.

एका दिवसात 17 विकेट्स पडल्या. आपण हे कोणत्या प्रकारचं कसोटी क्रिकेट खेळत आहे? हा कशाप्रकारचा कसोटी सामना होता? तुम्ही स्पिनला साथ देणारी खेळपट्टी जरुर बनवा, मात्र अशाप्रकराच्या खेळपट्टी असूच नयेत, असं इंझमाम म्हणाला.

VIDEO : इंझमाम उल हकने नेमकं काय म्हटलंय? पाहा –   

संबंधित बातम्या  

टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करावी, अहमदाबाद पीचच्या वादानंतर शोएब अख्तरचा सल्ला

Ind vs Eng : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणारा ‘हा’ दिग्गज खेळाडू मैदानात परतला, इंग्लंडची आता खैर नाही  

India vs England 2021 | टीम इंडियाला भारतात सलग 13 वी कसोटी मालिका जिंकण्याची संधी

 

(Pakistan cricketer Inzamam ul Haq questions over Ahmadabad cricket pitch India vs England 3rd test match demand icc should take action on BCCI Ashwin Axar patel)