पाकिस्तानच्या धडकी भरवणाऱ्या बॉलरचा संन्यास, आता करणार हे काम, तडकाफडकी निर्णय का घेतला?

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज आयमन अन्वर हीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृतपणे तिच्या निर्णयाला दुजोरा दिला आहे.

पाकिस्तानच्या धडकी भरवणाऱ्या बॉलरचा संन्यास, आता करणार हे काम, तडकाफडकी निर्णय का घेतला?
पाकिस्तान महिला क्रिकेटची वेगवान गोलंदाज आयमन अन्वरची निवृत्ती, कारण की..
Image Credit source: Getty Images
| Updated on: Aug 26, 2026 | 4:50 PM

पाकिस्तान महिला क्रिकेटमधील अनुभवी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज आयमन अन्वर हीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. 34 वर्षीय आयमन अन्वरने पाकिस्तानसाठी वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. पाकिस्तान क्रिकेटसाठी 2016 ते 2023 या कालावधीत खेळली. 2016 मध्ये पदार्पणाचा पहिला सामना खेळला होता. या दरम्यान तिने 45 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. टी20 क्रिकेटमधील 37 सामन्यात 29 विकेट घेतल्या आहेत. तर 8 वनडे सामन्यात तिच्या नावावर 4 विकेट आहेत. यासह तिने आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत एकूण 33 विकेट घेतल्या आहेत. पण आयमन अन्वर गेल्या काही काळापासून फॉर्म आणि फिटनेसच्या समस्येमुळे पाकिस्तानच्या मुख्य संघातून बाहेर होती. आता आयमन अन्वरने मॅच ऑफिशियल आणि मॅच रेफ्री म्हणून नवीन इनिंग सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आयमन अन्वरने पाकिस्तानसाठी चार वर्ल्डकप खेळले आहेत. यात दोन टी20 वर्ल्डकप आणि दोन वनडे वर्ल्डकप स्पर्धांचा समावेश आहे. आयमन अन्वरने वर्ष 2023 मध्ये पाकिस्तानसाठी पहिला सामना खेळला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध पार्लमध्ये पार पडलेल्या टी20 सामन्यानंतर तिचा संघातून पत्ता कापला गेला. आयमन अन्वरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकच सामना खेळला. रावलपिंडीत पार पडलेल्या या सामन्यात आयमनने 2 विकेट घेतल्या होत्या. हा सामना 11 मार्च 2023 रोजी झाला होता. संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेल्यानंतर काही काळ आयमन अन्वरने निवदेकीची भूमिका बजावली. पण क्रिकेटच्या मैदानातून दूर जाणं तिला काही रूचलं नाही. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाकडे वळली पण वेगळ्या भूमिकेत…

34 वर्षीय आयमन अन्वरला क्रिकेट मैदानावर खेळाडूऐवजी आता मॅच रेफ्री आणि क्रिकेट ब्रॉडकास्टर म्हणून काम करायचं आहे. यासाठी तिने पीसीबीचा मॅच रेफ्री होण्यासाठीचा आवश्यक असणारा ‘इंडक्शन कोर्स’ पूर्ण केला आहे. निवृत्ती जाहीर करताच तिने राष्ट्रीय महिला अंडर-19 स्पर्धेत मॅच रेफ्री म्हणून थेट मैदानात काम करण्यास सुरुवात देखील केली आहे. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखली जाणारी आयमन अन्वर आता मॅच रेफ्री म्हणून नव्या इनिंगची सुरूवात झाली आहे.

Follow Us