AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या

एशियन्स गेम्स स्पर्धेचं यजमानपद जापानकडे असून भारतीय संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेत क्रिकेट स्पर्धाही असल्याने भारत पाकिस्तान सामना होणं सहाजिकच आहे. त्यात दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी थेट उपांत्यपूर्व फेरीत भिडणार आहेत.

Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या
Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्याImage Credit source: PTI/GETTY
| Updated on: Aug 26, 2026 | 2:54 PM
Share

एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून 17 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावाधीत ही स्पर्धा होणार आहे. यात महिलांचे क्रिकेट सामने 17 ते 22 सप्टेंबर दरम्यान, तर पुरूषांचे सामने 24 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान खेळवले जातील. आता या स्पर्धेतील सामन्यांचं वेळापत्रक समोर आलं आहे. यात भारत, बांग्लादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना सीडेड संघात ठेवलं आहे. नेपाळ, जापान आणि अफगाणिस्तान यांना ए गटात, तर हाँगकाँग, मलेशिया आणि ओमान हे बी गटात आहेत. त्यामुळे भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका हे संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहेत. भारताचा पहिला सामना थेट 28 सप्टेंबरला होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना होईल. तर या सामन्यात पराभूत झालेला संघ थेट बाहेर असेल.

एशियन्स गेम्स पुरूष क्रिकेट सामन्यांचं वेळापत्रक

  • 24 सप्टेंबर (गुरुवार), सकाळी 9:00 वाजता: अफगाणिस्तान विरुद्ध जपान
  • 24 सप्टेंबर (गुरुवार), दुपारी 2:00 वाजता: हाँगकाँग (चीन) विरुद्ध मलेशिया
  • 25 सप्टेंबर (शुक्रवार), सकाळी 9:00 वाजता: हाँगकाँग (चीन) विरुद्ध ओमान
  • 25 सप्टेंबर (शुक्रवार), दुपारी 2:00 वाजता: अफगाणिस्तान विरुद्ध नेपाळ
  • 26 सप्टेंबर (शनिवार), सकाळी 9:00 वाजता: जपान विरुद्ध नेपाळ
  • 26 सप्टेंबर (शनिवार), दुपारी 2:00 वाजता: मलेशिया विरुद्ध ओमान
  • 28 सप्टेंबर (सोमवार), सकाळी 9:00 वाजता: उपांत्यपूर्व फेरी: पाकिस्तान विरुद्ध गट ‘ब’ मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ
  • 28 सप्टेंबर (सोमवार), दुपारी 2:00 वाजता: उपांत्यपूर्व फेरी: भारत विरुद्ध गट ‘अ’ मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ
  • 29 सप्टेंबर (मंगळवार), सकाळी 9:00 वाजता: उपांत्यपूर्व फेरी: श्रीलंका विरुद्ध गट ‘अ’ चा विजेता
  • 29 सप्टेंबर (मंगळवार), दुपारी 2:00 वाजता: उपांत्यपूर्व फेरी: बांगलादेश विरुद्ध गट ‘ब’ चा विजेता
  • 1 ऑक्टोबर (गुरुवार), सकाळी 9:00 वाजता: पहिली उपांत्य फेरी (सीकेटी15 च्या उपांत्यपूर्व फेरीचा विजेता विरुद्ध सीकेटी18 चा विजेता)
  • 1 ऑक्टोबर (गुरुवार), दुपारी 2:00 वाजता: उपांत्य फेरी 2 (सीकेटी16 उपांत्यपूर्व फेरीचा विजेता विरुद्ध सीकेटी17 चा विजेता)
  • 3 ऑक्टोबर (शनिवार), सकाळी 9:00 वाजता: कांस्यपदक सामना
  • 3 ऑक्टोबर (शनिवार), दुपारी 2:00 वाजता: अंतिम सामना

भारतीय पुरूष संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा

महिला क्रिकेट वेळापत्रक

  • 17 सप्टेंबर (गुरुवार), सकाळी 9:00 वाजता: बांगलादेश विरुद्ध चीन
  • 17 सप्टेंबर (गुरुवार), दुपारी 2:00 वाजता: पाकिस्तान विरुद्ध थायलंड
  • 18 सप्टेंबर (शुक्रवार), सकाळी 9:00 वाजता: श्रीलंका विरुद्ध मलेशिया
  • 18 सप्टेंबर (शुक्रवार), दुपारी 2:00 वाजता: भारत विरुद्ध जपान
  • 20 सप्टेंबर (रविवार), सकाळी 9:00 वाजता: पहिली उपांत्य फेरी (सीकेटी02 चा विजेता विरुद्ध सीकेटी03 चा विजेता)
  • 20 सप्टेंबर (रविवार), दुपारी 2:00 वाजता: दुसरी उपांत्य फेरी (सीकेटी01 चा विजेता विरुद्ध सीकेटी04 चा विजेता)
  • 22 सप्टेंबर (मंगळवार), सकाळी 9:00 वाजता: कांस्यपदक सामना
  • 22 सप्टेंबर (मंगळवार), दुपारी 2:00 वाजता: अंतिम सामना

Follow Us
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा...
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय
थकीत बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, वडेट्टीवारांनी सरकारवर साधल निशाणा
गजानन देवकते प्रकरण: थकलेल्या बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, विजय वडेट्टीवारांनी सरकारवर साधला निशाणा.
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर...
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
MPSC FDA पेपरफुटी: अभिमन्यू पवारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?
एका प्रियकरामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका
MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती,
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती, असं काही केलं की...